AAI Recruitment 2024: तुम्हीही विमानतळ प्राधिकरण क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर भारतीय विमानतळ प्राधिकरणने तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी सादर केली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने 2024 मध्ये ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी इच्छुक उमेदवार ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत AAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
पदांची संख्या आणि तपशील:
एकूण २४ पदे
१४ पदे पदवीधर शिकाऊ
१० पदे डिप्लोमा अप्रेंटिससाठी
शैक्षणिक पात्रता:
उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून चार वर्षांची नियमित पदवी (ग्रॅज्युएट) किंवा तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा (डिप्लोमा) पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा:
उमेदवाराचे वय ३१ डिसेंबर २०२४ रोजी २७ वर्षे असावे.
स्टायपेंड:
ग्रॅज्युएट अप्रेंटिस: ₹15,000 प्रति महिना
डिप्लोमा अप्रेंटिस: ₹12,000 प्रति महिना
निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड मुलाखत, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्राच्या आधारावर केली जाईल.
शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेलवर माहिती पाठवली जाईल.
महत्वाची तारीख:
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ डिसेंबर २०२४
अर्ज कसा करावा:
इच्छुक उमेदवार AAI च्या अधिकृत वेबसाइट (aai.aero) वर जाऊन अर्ज करू शकतात.
तुम्ही या पदांसाठी अर्ज करायचा विचार करत असल्यास, शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करणे सुनिश्चित करा.