पारोळा : रस्त्यावर बेदारकपणे वाहन चालनविणे हे अपघातास कारणीभूत ठरु शकते. याकरिता ठिकठिकाणी वाहनधारकांना वेग मर्यादा पाळण्याच्या सूचना केलेल्या असतात. अशाच एका प्रकारात पारोळा धरणगाव रस्त्यावर दुचाकीस्वाराचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने बैलगाडीला मागून जोरदार धडक दिली. याधडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्य ओढवला. तसेच या अपघातात ज्या बैलगाडीला धडक देण्यात आली होती त्या बैलगाडीवरील वृद्ध शेतकरी व बैल जखमी झाले आहे. तसेच यात बैलगाडीचे देखील नुकसान झाले आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पारोळा तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील चंद्रकांत विजय पाटील (वय- २४) हा मयत झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा धरणगाव रस्त्यावरून राजवड येथील रहिवाशी सुभाष किशन पाटील (वय ६५) हे ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता बैलगाडीने घरी जात होते. यावेळी मागून चंद्रकांत पाटील हा तरुण दुचाकीने येत होता. त्यावेळी त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. दुचाकीवर नियंत्रण नसल्याने दुचाकी थेट बैलगाडीच्या मागे आदळली.
या अपघातात चंद्रकांत पाटील यांना गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने धरणगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले, रुग्णालयत त्याचा मृत्यू झाला. तर या अपघातात शेतकरी सुभाष पाटील व दोन्ही बैल जखमी झाले असून बैलगाडीचे देखील नुकसान झाले आहे. याप्रकरणी सुभाष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेदरकारपणे रस्त्यावर दुचाकी चालविल्याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पो.नि. सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण पाटील हे तपास करीत आहे.