Accident News : चालकाचा ताबा सुटला, बस धडकली इलेक्ट्रिक खांबावर , २८ जण जखमी

जळगाव : धरणगाव तालुक्यातील दोन गावाजवळील स्मशानभूमीजवळ शुक्रवार १३ डिसेंबर  रोजी सकाळी ६ वाजता एक धक्कादायक अपघात घडला. लाडली येथून जळगाव कडे रेल मार्गे येत असलेल्या बसचा ताबा चालक अशोक जगन्नाथ पाटील (वय ५६) यांच्या नियंत्रणातून सुटला आणि बस वळणावर असलेल्या इलेक्ट्रिक खांबावर धडकली. या अपघातामुळे बस नाल्यात जाऊ शकली असती, पण सुदैवाने इलेक्ट्रिक खांब्यामुळे पुढील अनर्थ टळला.

बस क्रमांक (एमएच १४ बीटी २८८७) ने १३ डिसेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता लाडली येथून शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. पुढे रेल गावातील विद्यार्थ्यांना घेऊन पाळधीकडे जात असताना वळणावर बसचा ताबा सुटला आणि ती खांबाला धडकली. या अपघातात २८ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघात २८  प्रवासी जखमी झाले असून त्यांची नावे पुढील प्रमाणे
लावण्या सोनवणे (वय-११), मयुरी पाटील (वय-१४),  हर्षा पाटील (वय-१३), आधार सोनवणे (वय-४५),  जनाबाई पाटील (वय-५५), सायली पाटील (वय-१५), अजय पाटील (वय-१३), गुंजन सपकाळे (वय-१६), अशोक जगन पाटील (वय-५७),, कुंदन पवार (वय-१३),जगन भीमराव पवार (वय-४२),  भावना शांताराम पाटील (वय-१६), वालात्री शंकर शिरसाट (वय-५३), कुणाल गुंजाळ पवार (वय-१३),सुनीता भिल (वय-४६), काजल पाटील (वय-१५), मोहिनी शारद पाटील (वय-१७), रेखाबाई विशाल दांडेकर (वय-२५ सर्व रा. रेल ता.धरणगाव), जिजाबाई पंढरीनाथ पाटील (वय-६२),पंढरीनाथ आत्माराम पाटील (वय-६७, दोन्ही रा. लाडली ता. धरणगाव),  विश्वनाथ सदाशिव पाटील (वय -७१), निखिल सुधाकर पाटील (वय-२३), तन्मय मंगल पाटील (वय-१९), गुंजन सुनील पाटील (वय १४), विवेक छगन पाटील (वय -१७), राम शरद अवचिते (वय-१३), जयेश चंद्रकांत पाटील (वय-१६), सायली सुरेश पाटील (वय-१७ सर्व रा. रेल ता.धरणगाव)

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोनगाव लाडली, दोनगाव आणि रेल गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उतरवून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  या घटनेने स्थानिकांमध्ये मोठी भीती निर्माण केली असून, पुढील दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी वाहतूक सुरक्षा आणि वाहन व्यवस्थापनावर लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे.