---Advertisement---
---Advertisement---
पाचोरा : कजगाव ते चाळीसगाव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे कि. मी. क्रं. ३४६ / ४ / ६ जवळ धावत्या रेल्वेखाली सापडुन एका २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (२ ऑगस्ट ) रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली असून घटनेची माहिती मिळताच पाचोरा लोहमार्ग पोलिस दुर क्षेत्राचे पोलिस हवालदार लक्ष्मण पवार यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेऊनघटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. या ठिकाणी तपासणी करुन त्यास मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदनानंतर शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
मयताचे नाव दुर्गेश भानुदास महाराज (वय-२४) ( रा. कजगाव ता. भडगाव) असे मृत असुन गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार भानुदास महाजन यांचा तो मोठा मुलगा होता. दुर्गेश महाजन याचे शिक्षण डी फार्मसी झाले आहे. शिक्षणानंतर दुर्गेश हा नाशिक येथे खाजगी कंपनीत नोकरीला होता.
अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच दुर्गेश याचा विवाह झाला होता. सदर घटनेप्रकरणी पाचोरा रेल्वे दुरक्षेत्र पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलिस दुरक्षेत्राचे पो. हे. लक्ष्मण पवार हे करीत आहेत. दुर्गेश महाजन याचे पश्चात् आई, वडिल, एक लहान भाऊ असा परिवार आहे. अत्यंत मितभाषी व कष्टाळू दुर्गेश महाजन याच्या अकस्मात मृत्यूने कजगावसह परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, दुर्गेशचा मृत्यू अपघाती आहे की त्याचा घातपात करण्यात आली आहे अशी चर्चा रंगली आहे.