जळगाव : बाजार करुन आपल्या झोपडीकडे जाणाऱ्या शेतमजुरास लक्झरी बसने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पारोळा राष्ट्रीय महार्गावर घडला. याअपघातात लक्झरी बस चालकाच्या विरोधात पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे परप्रांतीय मजूर हे उदरनिर्वाह करण्यासाठी आले आहेत. यातील एका शेतमजुरास राष्ट्रीय महामार्गावर लक्झरी बसने जोरदार धडक दिली. या अपघातात त्या मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी घडली. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मध्यप्रदेश येथील रहिवासी असलेले काही कुटुंब हे उदरनिर्वाहसाठी पारोळा तालुक्यातील म्हसवे येथे आले आहेत. हे कुटुंब शेतमजूरी करुन आपली गुजराण करीत आहे. रविवार, १ डिसेम्बर रोजी पारोळा शहरात बाजार करण्यासाठी धरमसिंग धनसिंग पटेल (३५) हे गेले होते. ते सायंकाळी बाजारातून सामना घेतल्यावर पायीच आपल्या झोपडीकडे निघाले होते. त्याच वेळी पारोळा येथून जळगावकडे जाणाऱ्या भरधाव लक्झरी बस (एमएच ४३/ एच८१९९) ने धरमसिंग पटेल यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की धरमसिंग पटेल यांचा जागीच अंत झाला. याबाबत पारोळा पोलिसात टंटिया पटेल यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन पारोळा पोलिसात पोलिसात लक्झरी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार डॉ. शरद पाटील करीत आहेत.