तरुण लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२२ । धुळे शहरातील वरखेडी फाट्याजवळ मंगळवारी उशीरा रात्री एक विचित्र अपघात झाला. यात हिंद्रा कंपनीच्या २ कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी आझाद नगर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली.
विजय पाटील आणि रमाकांत पाटील असे मयताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील मुंबई – आग्रा महामार्गवर वरखेडी रोड येथे ट्रक बिघडला होता. तो दुरुस्त करण्यासाठी महिंद्रा कंपनीचे २ मेकॅनिक गेले होते. ट्रक दुरुस्तीचे काम महामार्ग येथे मेकॅनिकलसह अन्य तीन जण करत असताना याच दरम्यान मालेगावकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने पुढील ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्या ट्रकने काही अंतरावर उभे असलेल्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. यात मेकॅनिकल आणि त्याचा सहकारी रस्त्यावर फेकले गेले. ते दोघे रक्तबंबाळ झाले होते. त्यात दोघींचा जागीच मृत्यू झाला.
अपघात झालेल्या महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. ही वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. या दुर्दैवी घटनेत दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींपैकी एकाची ओळख पटली असून त्याचे नाव ज्ञानसिंग भावर हा मध्यप्रदेश मधील रहिवाशी आहे. तर एकाची ओळख अजून पटू शकलेली नाही, अशी माहिती आझाद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी दिली आहे.