माजी आयपीएस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आचार्य किशोर कुणाला यांचे निधन झाले. २९ डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते पाटणा येथील महावीर मंदिर ट्रस्टचे सचिव तसेच बिहार राज्य धार्मिक विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या निधनाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस)ने शोक व्यक्त केला आहे.
आचार्य किशोर कुणाल यांच्या निधनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शोक व्यक्त केला आहे. RSS सोशल मीडिया हँडलवर लिहिले आमचे मनःपूर्वक विचार त्यांच्या कुटुंबीयांसह आणि प्रियजनांसोबत आहेत.
संघाने सोशल मीडियावर त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांच्या कुटुंबीयांशी सहानुभूती दर्शविली. यात संघाने त्यांच्या सामाजिक कार्याचे आणि देशासाठी केलेल्या योगदानाचेही स्मरण केले. कुणालजी हे एक सक्षम प्रशासक होते, तसेच भारतीय ज्ञान परंपरेचे अभ्यासक होते. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी आंदोलनात आणि मंदिराच्या बांधकामात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.
आचार्य किशोर कुणाल यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यसाठी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी मुझफ्फरपूर जिल्ह्यातील बरुराज गावात प्रारंभिक शिक्षण घेतले आणि पाटणा विद्यापीठातून इतिहास आणि संस्कृत विषयांचा अभ्यास केला. १९७० मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली आणि १९८३ मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. १९८३ साली भारतीय पोलीस सेवा(आयपीएस) मध्ये सामील झाले होते. त्यांनी एक उत्तम प्रशासक म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्णपणे सामाजिक कार्यास वाहून घेतले. सध्या ते बिहार राज्य धार्मिक विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि पाटणाच्या प्रसिद्ध महावीर मंदिर ट्रस्टचे सचिव म्हणून कार्यरत होते.
किशोर कुणाल यांना २००८ साली त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ‘भगवान महावीर पुरस्कार’ मिळाला. भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठित सन्मान देण्यात आला. या पुरस्काराने बिहार-झारखंडमधील पहिले व्यक्ती म्हणून किशोर कुणाल यांना गौरवण्यात आले.