जळगाव : शहरातील गोलाणी मार्केटसमोर असलेल्या एका गल्लीतून बुधवारी सायंकाळी युवक – युवतींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या या युवक युवतींना दोन रिक्षांमध्ये भरून पोलीस ताफा जात असल्याचे पाहून या भागात चांगलीच चर्चा रंगली होती.
गोलाणी मार्केटसमोर असलेल्या जुन्या एलआयसी बिल्डींगच्या मागील एका रिकाम्या बिल्डिंगमध्ये काही आंबटशौकीन युवक-युवती बसले असल्याची माहिती पोलिसांना समजली.
या ठिकाणी पोलीस पोहोचताच काही जणांनी पळ काढण्याचा प्रयत्नही केला, मात्र अरूंद जागेमुळे ते शक्य न झाल्याने ताब्यात घेतलेल्या या युवक युवतींनी शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन रिक्षेत अक्षरश: कोंबून बसवत पोलीस स्टेशनला नेले. त्यांच्या आई- वडिलांना बोलावून नंतरच त्यांना सोडले जाईल, असे सांगण्यात आले.