Jalgaon News: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 250 हून अधिक रिक्षा चालकांवर कारवाई

#image_title

Jalgaon News: बुधवार, 18 डिसेंबर रोजी जळगाव शहर वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने आज जळगाव शहरात रिक्षा चालकांवर धडक कारवाई केली. पोलीसांनी जळगाव शहरातील वेगवेगळ्या भागात जावून 250 हून अधिक रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलीय. अशी माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावीत यांनी दिली आहे.

सकाळी शहरात ठीक ठिकाणी पोलीस वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे नाकाबंदी करीत नियमांचे उल्लंघन करणारे रिक्षा चालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.

या गुन्ह्यांसाठी झाली कारवाई
ज्या रिक्षा चालनाकडे कडे बिल्ला नसणे, रिक्षा चालवण्याची परमिट नसणे, विनापरवाना गॅस किटवर वाहन चालवणे, पियूसी नसणे, इन्शुरन्स नसणे आणि जादा प्रवासी भरून वाहतूक करणे, अशा गुन्ह्यांसाठी दंडात्मक कारवाई करण्यात आली.

सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार “आतापर्यंत 250 हून अधिक रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. प्रत्येक वाहनाची तपासणी करून नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.” या कारवाईमुळे रिक्षा चालकांना नियमांचे पालन करण्याची जाणीव करून देण्यात आली आहे.