---Advertisement---
धुळे : धुळे जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आउट तसेच नाकाबंदी उपक्रम पोलिसांनी हाती घेतले आहेत. हे उपक्रम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांअंतर्गंत रविवारी (२० जुलै) रोजी जिल्ह्यात विविध २४ ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईअंतर्गंत तीन पिस्तूल , सात तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या आहेत.
ऑपरेशन ऑल आउट तसेच नाकाबंदी उपक्रमांतर्गत जिल्हाभरात २४ ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान तीन पिस्तूल व ७ तलवारी जप्त करण्यात आल्या.
---Advertisement---
तसेच गावठी दारूच्या भट्टया उद्धवस्त करण्यात आल्या. यापुढे देखील अशीच कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या देखरेखीखाली धुळे जिल्हयात नाकाबंदी व ऑल आऊट ऑपरेशन राबवून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार २४ ठिकाणी कारवाई करून पोलिसांनी तीन पिस्तूल ७ तलवारींसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबरोबरच गावठी दारूच्या अनेक भट्टया उध्वस्त करण्यात आल्या या कारवाईदरम्यान पोलिसांनी १६ लाख ६१ हजार ७८० रूपयांची गावठी दारू जप्त करून ती नष्ट केली. तसेच दारू बनविण्याचे रसायन, ड्रम व साहित्य हस्तगत जप्त करण्यात आले. तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.