जळगाव : फ़ैजपूर पोलीस स्थानक अंतर्गत गुन्ह्यांची नोंद आलेल्या एकावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्यास स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. ज्ञानेश्वर नामदेव तायडे ऊर्फ नाना कोळी ( ३६ रा. कोळन्हावी ता. यावल) असे त्याचे नाव आहे.
फैजपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील स्थानबध्द ज्ञानेश्वर तायडे ऊर्फ नाना कोळी याच्या विरुध्द ९ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन व्यक्ती (व्हिडीओ पायरेट), वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करण्याबाबत वाळू तस्कर या संज्ञेत प्रस्ताव पाठविला होता.
फैजपूर पोलीस स्थानकाचे सहा. पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी तयार करुन सदरचा प्रस्ताव हा स्था.गु.शा. जळगाव येथे ८ ऑगस्ट रोजी सादर केला. या प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद याच्याकडे सादर केला असता ५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांंनी कोल्हापूर कारागृहात स्थानबध्द करण्याबाबत आदेश पारीत केला आहे.
एम.पी.डी.ए. प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहा. पोलीस अधीक्षक,अन्नपूर्णा सिंह, फैजपूर उपविभाग, फैजपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.निरी. बबन आव्हाड, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव व त्यांचे अधिनस्त पोहेको सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकों/जयंत भानुदास चौधरी, पोहेको रफिक शेख कालु, पोहेकों/संदिप चव्हाण, पोकों/ईश्वर पंडीत पाटील अशांनी काम पाहिले आहे.