तळोद्यातील ॲड. संजय पुराणिक यांची राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

---Advertisement---

 

तळोदा येथील विधी तज्ज्ञ ॲड. संजय पुराणिक यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या (MSCPCR) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागाने याबाबत अधिकृत आदेश जारी केला असून त्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आले आहे. या निर्णयामुळे तळोदा शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कायदा आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचा दीर्घ अनुभव लक्षात घेऊन राज्य शासनाने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. बालकांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाला आळा घालणे तसेच शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे ही आयोगाची महत्त्वाची जबाबदारी असते. या पार्श्वभूमीवर पुराणिक यांच्या नेतृत्वाखाली आयोगाच्या कामकाजाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नियुक्तीची बातमी समोर येताच तळोदा शहरासह जिल्ह्यातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था तसेच विधी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करत ही नियुक्ती योग्य ठरल्याचे मत व्यक्त केले आहे.

  • बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांना सुरक्षित वातावरण मिळवून देणे हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील. समाजातील वंचित आणि पीडित बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने कार्य करेन. राज्य सरकारने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्यास मी नक्कीच सार्थ ठरेल. 
    ॲड. संजय पुराणिक (नवनियुक्त अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग)

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---