मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१४ सालच्या निवडणुकीमध्ये केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी बारामती कोर्टाकडून त्यांना समन्स बजावण्यात आला आहे. या समन्सनुसार अजित पवार यांना १६ डिसेंबर रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. माजी आयपीएस अधिकारी सुरेख खोपडे यांनी अजित पवारांच्या निवडणुकीतील वादग्रस्त वक्तव्याविरोधात याचिका दाखल केली आहे. खोपडे हे त्यावेळी ‘आप’कडून निवडणूक लढवत होते. या याचिकेवर आता बारामती कोर्टाने अजित पवारांना समन्स बजावले आहे. अजित पवारांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मासाळवाडी या गावामध्ये आमच्या उमेदवाराला मतदान केले नाही, तर गावचे पाणी बंद करू, असे वक्तव्य केले होते. तसेच तुमचा पाणीप्रश्न दोन महिन्यांत सोडवतो, परंतु मतदान आम्हालाच करा, असे अजित पवार यांनी म्हटले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये वार्षिक समारंभाच्या आयोजनावरून वाद झाला होता. मंगळवारी दुपारी अडीच वाजता तक्रारदार मुलगा वर्गात बसलेला असताना, आरोपी मुलाने पाठीमागून त्याच्या गळ्यावर धारदार काचेच्या तुकड्याने वार केले. मुलाच्या या कृत्यामुळे वर्गातील अन्य विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली. त्याचवेळी आरोपीने जखमी मुलाला ‘मी तुझी विकेट पाडीन’, अशी धमकी दिली. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.