---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अर्थात यंदा सर्वच प्रकल्प समाधानकारक पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. सद्यःस्थितीत ९६.०२ टक्के प्रकल्पीय साठा आहे.
तर गिरणा प्रकल्प शंभर टक्के असून ०.२६ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाल्याने ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे सिंचनासाठी सोडण्यापूर्वीच गिरणेत पाणी आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दि.१५ डिसेंबरनंतर सिंचनासाठी आवर्तन सोडण्याची प्रशासनाने तयारी ठेवली आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पातून आवक सुरू झाल्याने गिरणा पुन्हा शंभरीवर गेले. त्यामुळे शुक्रवारपासून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी या पाण्याच्या माध्यमातून पिकांना बूस्टर मिळणार आहे.
आवक वाढण्याची शक्यता…
गिरणा प्रकल्पात गेल्या २४ तासांत ०.२६ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे. प्रकल्पात १०० टक्के जलसाठा झाल्याने शुक्रवारी दुपारी ४ वाजता प्रकल्पातून ८०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. सद्यः स्थितीत गिरणा प्रकल्पात येणाऱ्या पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे.









