Amit Shah on Kashmir: राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन पार पडले. ‘जम्मू-काश्मीर और लडाख थ्रू द एजेस’ या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. प्रसंगी अमित शाह यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी काश्मीर संदर्भात हे वक्तव्य केलं आहे. यावेळी राज्यकर्त्यांना खूश करण्यासाठी लिहिलेला इतिहास काढून टाकण्याची वेळ आली आहे, असे म्हणत त्यांनी एक मोठा संकेत दिला आहे. जाणून घ्या नेमकं काय म्हणाले अमित शाह.
काश्मीर पुन्हा एकदा चर्चेच आहे. याचे कारण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य. अमित शाह यांनी गुरुवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात सांगितले की, काश्मीरचे नाव हिंदू ऋषी कश्यप यांच्या नावावर ठेवले गेले आहे. काश्मीरला कश्यपांची भूमी म्हटले जाते, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कश्यप ऋषींच्या नावावरून काश्मीरचे नाव पडल्याची शक्यता आहे. शहा म्हणाले. ते पुढे म्हणाले की, भारताला समजून घ्यायचे असेल तर या देशाला जोडणारी वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. भारताचा इतिहास हजारो वर्षांचा आहे, पण तो विसरण्याचा प्रयत्न केला गेला. हा देश कधीही एकसंघ होऊ शकत नाही, असे खोटे पसरवले गेले आणि लोकांनी ते स्वीकारले.
अमित शाह पुढे म्हणाले, ‘प्रत्येक चर्चेत इतिहासकारांना शिव्याशाप देऊ नका. जे काही करायचे होते ते त्यांनी केले. आता आम्हाला कोण रोखू शकेल? देश स्वतंत्र झाला आहे आणि देशात एक सरकार आहे जे देशाच्या विचारांवर चालते. आता आमचे काम आहे की, पुरावे आणि तथ्यांसह इतिहास संकलित करणे. पुस्तकाचे उदाहरण देताना अमित शाह यांनी चरक, सुश्रुत अशा अनेक विद्वान आणि महापुरुषांची नावे घेतली आणि त्यांनी काश्मीरच्या इतिहासात कसे महत्त्वाचे योगदान दिले ते सांगितले. आपल्या सर्वांना माहित आहे की काश्मीरला ऋषी कश्यपची भूमी देखील म्हटले जाते. त्यांच्या नावावरून काश्मीर हे नाव पडले असावे, असे म्हणत काही संकेतही त्यांनी दिले. त्यामुळे अमित शाह यांच्या विधानामुळे आता कश्मीरचे नाव बदलणार अशा चर्चा सुरु झाल्या आहे.