जळगाव : ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉइज AIFEE च्या पुरस्कृत व महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी मंगळवार, २६ रोजी निदर्शने आंदोलन करण्यात आले. हे आंदोलनात जळगाव सर्कल झोन आॉफिस समोर करण्यात आले. या आंदोलनात जळगाव परी मंडळातील,मंडळ आणि विभागीय उपविभागीय कार्यालय अंतर्गत कार्यरत सर्व सभासद पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.
यावेळी आंदोलकांनी भारतातील ऊर्जा क्षेत्राचे खाजगीकरण थांबवा.,स्मार्ट प्रीपेड मीटर बाबत केंद्र सरकारचे धोरण व राज्य सरकार करत असलेली अंमलबजावणी थांबवा. वीज कामगारांना जूनी पेन्शन योजना लागू करा.विद्युत (संशोधन )कायदा मागे घ्या. कंत्राटी कामगारांना कायम करण्याबाबत निर्णय घ्या. कामगार आणि अभियंता यांच्या सर्व रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात. उत्तर प्रदेश उर्जा क्षेत्रात सर्व निलंबित २५०० कामगारांना पुन्हा कामावर घ्या, आदी मागण्या केल्या.
विरेंद्र सिंग पाटील यांनी द्वार सभा संबोधित करताना केंद्र व राज्य सरकारच्या खाजगीकरण व फ्रैंचाईझी करणाच्या धोरणाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. सर्कल सेक्रेटरी कॉ जितेंद्र अस्वार, कॉ. प्रभाकर महाजन, कॉ. किशोर जगताप, कॉ रविंद्र गायकवाड,कॉ भुषण सपकाळे भुसावळ कॉ.चंद्रकांत भिसे जामनेर,कॉ सचिन फड, कॉ शरद बारी,कॉ.शरद पवार, कॉ नितेंद्र गिरासे कॉ गिरीश बरहाटे कॉ मुकेश बारी,कॉ कमलाकर काकडे कॉ शरद मोरे पाचोरा यांनी सहभाग घेतला.