समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; महिलेसह चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू, दोन गंभीर

तरुण भारत लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२२ । समृद्धी महामार्गाच काही दिवसांपुर्वीच उदघाटन झाल मात्र, तिथे आतापर्यंत दोन  अपघात झाल्याचे समोर आले असून पुन्हा एक अपघात झाल्याचे समोर आले आहे. यात चिमुकलीसह महिला जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. नागपुरच्या दिशेने जाणारी कार पलटी होऊन हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा परिसरातील समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला आहे.

सूत्रानुसार, पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. गाडीतील प्रवासी हे नागपूरचे असल्याचे कळते. मुंबईहून नागपूरकडे प्रवास करत असताना अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की, मृत मुलगी गाडीबाहेर उडून काही फूट अंतरावर जाऊन पडली, असे स्थानिकांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. अपघात झाला त्यावेळी गाडीत चारजण उपस्थित होते.

दरम्यान, खासगी कामासाठी गेलेल्या व्यापाऱ्याचा‎ औरंगाबाद येथून परत येत असताना‎ ‎ समृद्धी महामार्गावरील‎ ‎ जालन्याजवळ‎ ‎झालेल्या कार‎ ‎अपघातात एक जागीच‎ ‎ठार तर तीन‎ ‎जण जखमी झाले होते तसेच महामार्ग सुरू झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी नागपूरजवळ मर्सिडिज कारचा अपघात झाला होता.