Shama Mohamed : काँग्रेस प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला ‘एक्स’ वर टॅग करत , “रोहित शर्मा जाड आहे, त्याने वजन कमी केले पाहिजे. आणि तो भारताचा सर्वात वाईट कर्णधार देखील आहे.” असे लिहले होते. या ट्विट नंतर अनेक राजकीय पक्ष आणि क्रिकेटप्रेमींनी त्त्यांच्यावर चांगलीच टीका केली होती.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माबाबतच्या वक्तव्यानंतर चर्चेत आलेल्या काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. रोहित शर्माला जाड्या म्हणणाऱ्या शमा मोहम्मद यांनी आता इस्लामबाबत भाष्य केलंय. जगभरात गणित हे इस्लामधून आलं असल्याचा दावा शमा मोहम्मद यांनी केलाय. शमा मोहम्मद यांचं वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालंय.

दरम्यान, या वक्तव्यानंतर शमा मोहम्मद यांची भाजपकडून खिल्ली उडवली जात आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी शमा मोहम्मद यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमित मालवीय म्हणाले, मला वाटतं की, त्यांनी ठरवलंय की काँग्रेसमध्ये केवळ राहुल गांधी बालीश वक्तव्य करु शकत नाहीत. काँग्रेसमध्ये अनेक लोक आहेत, जे राहुल गांधींपेक्षा जास्त बालीशपणा करु इच्छित आहेत. त्यांनी राहुल गांधींशी स्पर्धा सुरु केलीये, असं अमित मालवीय यांनी म्हटलंय.