---Advertisement---
जळगाव : शहरासह जिल्ह्यात खुनाच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दोन दिवसाआड खुनाच्या घटना समोर येत असून, या गुन्हेगारी वाढीमुळे नागरिक चिंतित आहेत. अशात पुन्हा एका एका २४ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सख्ख्या भावांना ताब्यात घेण्यात आले असून, प्रेम प्रकरणातून खून झाल्याचा संशय पोलिस उपविभागीय अधिकारी सुभाष ढवळे यांनी व्यक्त केला आहे.
विशाल उर्फ विष्णू गणेशगिरी गोसावी (२४, रा. मुक्ताईनगर) असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी विशाल व त्याचे मित्र आकाश धनगर (२८) आणि त्याचा भाऊ ऋषिकेश धनगर (२५) हे शिरसाळा येथे मारुतीच्या दर्शनासाठी गेले होते.
सायंकाळी परत आल्यानंतर मुक्ताईनगर बोदवड रस्त्यावर मोकळ्या जागेवर त्यांनी मद्यप्राशन केले. यादरम्यान आकाश व ऋषिकेश यांनी चाकूने वार करत विशालचा खून केला. या प्रकरणी सख्ख्या भावांना ताब्यात घेण्यात आले असून, प्रेम प्रकरणातून खून झाल्याचा संशय पोलिस उपविभागीय अधिकारी सुभाष ढवळे यांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी फिरवली तपासाची चक्रे
या घटनेमागे प्रेम प्रकरणातून निर्माण झालेल्या वादाचा संबंध असण्याची दाट शक्यता आहे. या दृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून, विशाल गोसावी याचे कोणासोबत प्रेमसंबंध होते आणि तो बेपत्ता झाल्यानंतर कोणत्या व्यक्तींच्या संपर्कात होता, याची कसून चौकशी सुरू आहे.









