जळगाव ‘मनपा’च्या रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लागणार ; सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी

जळगाव : शहर महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहे. महापालिकेचा कर्मचारी भरतीचा आकृतीबंध शासनाने यापुर्वीच मंजुर केला होता. मात्र सेवा प्रवेश नियमावलीस मान्यता मिळाली नसल्याने भरती होऊ शकली नाही. आता या नवीन आकृतिबंधास शासनाची मान्यता दिली आहे, त्यामुळे महापालिकेतील ४५० पदे भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार सुरेश दामू भोळे यांच्या प्रयत्नांना यश आले असल्याचे सांगण्यात आले.

जळगाव महानगरपालिका सेवा प्रवेश नियमावली 2024 ला राज्य शासनाने अखेर मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता महापालिकेत नियमित भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जळगाव शहर महानगरपालिकेत विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर नविन पद भरती नसल्याने उर्वरीत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत होता. यापूर्वी महापालिकेचा कर्मचारी भरतीचा आकृतीबंध शासनाने यापुर्वीच मंजुर केला होता. मात्र सेवा प्रवेश नियमावलीस मान्यता मिळाली नसल्याने भरती होऊ शकली नाही. यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

जळगाव महानगरपालिका सेवा नियम 2024” यांस मान्यता देण्यात आलेल्या मंजुरीमुळे जळगाव शहर महानगरपालिकेतील कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. जळगाव शहर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची कमतरतेमुळे नागरिकांच्या कामकाजात होणारी दिरंगाई,हा प्रश्न महानगरपालिकेतील रिक्त पदे भरती झाल्यामुळे मार्गी लागणार आहे. शहराच्या विकासासाठी सेवा प्रवेश नियम मंजुरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अनिल पाटील यांच्या सहकार्यामुळे यास मंजुरी मिळाली असल्याचेे आमदार सुरेश भोळे यांनी आभार मानले आहे.