---Advertisement---
शहादा: तालुक्यातील टेंभे त.सा. गावात किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. मोटरसायकलचा कट लागल्याच्या कारणावरून उद्भवलेल्या वादात एका व्यक्तीला गंभीर मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलासह तिघांवर गुन्हा दाखल करण्या आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,बुधवारी (६ ऑगस्ट ) रोजी रात्री ८:३० च्या सुमारास टेंभे त.सा. गावातील एकलव्य चौकात रमेश तेजमल भिल (माळीस) यांचा मुलगा विशाल उभा होता. यावेळी त्याला एका अज्ञात व्यक्तीने मोटरसायकलने कट मारला. याचा जाब विचारण्यासाठी रमेश भिल गेले असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली.
आरोपिंनी फिर्यादिच्या डोक्यावर, कपाळावर, फायटरने मारहाण केल्याने या प्रकरणी रमेश भिल यांच्या तक्रारीवरून सारंगखेडा पोलीस ठाण्यत एक अल्पवयिन मुलासह, पावबा रायबा भिल व रायबा भिल या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सपोनि रमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. अमृत ईशी अधिक तपास करत आहेत.