जळगाव : येथील दाणा बाजार माथाडी हमाल व जनरल कामगार सेनेतर्फे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. तसेच मतदानाच्या दिवशी हमाली बंद राहील असे कळविण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे तथा महायुतीचे जळगाव शहर मतदार संघांचे आमदार राजूमामा भोळे यांच्या विजयासाठी जणु संपुर्ण शहर एकवटत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आ. भोळे यांना भाजपाकडून सलग दोन आमदार झाले असून तिसऱ्यांदा ते निवडणूक लढवीत आहेत. आ. भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दररोज सामाजिक संघटना व राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय जनात पक्षात प्रवेश करत आहे. तसेच विविध संघटना आ. भोळे यांना पाठिंबा देत आहेत.
एका पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे की, दाणा बाजारातील माथाडी हमाल कामगार, हातगाडी कामगार, दुकानातील कामगारांचा आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा आहे. मतदानाच्या दिवशी मतदान करता यावे यासाठी हमाली कामकाज बंद राहील.
तसेच शहरातील इतर संघटनेतील हमाली कामगारांनी देखील आपले कामकाज बंद ठेवून मतदानाचे कर्तव्य बजवावे असे पत्रात म्हटले आहे. मतदान करणे हा राष्ट्रीय अधिकार असून प्रत्येक हमाल बांधवाने आपल्या कुटुंबीयांसह मतदान करावे असे आवाहन देखील अध्यक्ष शेषराव वलकर यांनी केले आहे.