Assembly Election 2024 : धुळे जिल्ह्यात पाचही मतदारसंघात चिन्ह वाटप जाहीर

धुळे : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले आहे. धुळे जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघ असून माघारीनंतर जिल्ह्यात ५६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यात एकाच टप्प्यात म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे पक्ष व चिन्ह जाहीर करण्यात आले आहे. यात पाचही विधानसभा मतदारसंघातील उमेदवार त्यांचे पक्ष आणि चिन्ह पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आले आहेत.

धुळे शहर विधानसभा मतदार संघात 8 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे. यात अनुपभैय्या ओमप्रकाश अग्रवाल (भारतीय जनता पार्टी) (कमळ), अनिल अण्णा गोटे (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) (मशाल), जितुभाऊ ऊर्फे जितेंद्र उंदा शिरसाठ (वंचित बहुजन आघाडी) (गॅस सिलेडर), जहागिरदार इर्शाद (समाजवादी पार्टी) (सायकल), आनंद जयराम सैंदाणे (बहुजन समाज पार्टी) (हत्ती), जितेंद्र गंगाधर मोरे (अपक्ष) (कपाट), ॲड. अन्सारी रईस अहमद अब्दुल कादिर (अपक्ष) (शिट्टी), शाह फारुक अन्वर (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लीमीन) (पतंग) असे आहेत.

साक्री विधानसभा मतदार संघात 18 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. यात मंजुळा तुळशीराम गावित (शिवसेना) (धनुष्यबाण), प्रविण (गोटू) बापू चौरे (इंडियन नॅशनल कॉग्रेस) ( हात), रमेश दौलत साने (बहुजन समाज पार्टी) (हत्ती), यशवंत देवमन माळचे (पिझन्टस् अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया) (शिट्टी), लाखन देवाजी पवार (भारत आदिवासी पार्टी) (हॉकी आणि बॉल), अशोक राघो सोनवणे (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी) (पेनाची निब सात किरणांसह), धर्मेंद्र बारकु बोरसे (अपक्ष) (रोड रोलर), गुलाब तानाजी पवार (अपक्ष) (ऑटो रिक्शा), प्रविण बापू चौरे (अपक्ष) (बॅट), प्रविण सुभाष सोनवणे (अपक्ष) (कॅमेरा), मिरा बाबुलाल शिंदे (अपक्ष) (जातं), रणजीत शांताराम गवळी (अपक्ष) (गॅस सिलेंडर), मोठाजी तुकाराम ठाकरे (अपक्ष) (बाकडा), इंजि.मोहन गोकुळ सूर्यवंशी (अपक्ष) (ऊस शेतकरी), युवराज सखाराम ठाकरे (अपक्ष) (कपाट), वैशाली विश्वजीत राऊत (अपक्ष) (दूरदर्शन ), रंजित भिवराज गायकवाड (अपक्ष), (फुटबॉल खेळाडू ), संजय शिवाजी बहिरम (अपक्ष) (ट्रक) असे आहेत.

शिंदखेडा विधानसभा मतदार संघात 12 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे. त्यात जयकुमार जितेंद्रसिंह रावल (भारतीय जनता पार्टी) (कमळ ), जाधव-पाटील गुलाब संतोष (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) (रेल्वे इंजिन), बेडसे संदिप त्र्यंबकराव (नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार) (तुतारी वाजवणारा माणुस), भाऊसाहेब नामदेव पवार (बहुजन समाज पार्टी) (हत्ती), गुलाब अय्युब पिंजारी (माइनोरिटीज डेमोक्रॅटिक पार्टी) (क्रेन), इक्बाल बहादुर तेली (अपक्ष) (सफरचंद), जुबेर मुशीर शेख (अपक्ष) (गॅस सिलेंडर), नामदेव रोहिदास येळवे (अपक्ष) (शिट्टी), वसंत धनराज पाटील (अपक्ष) (हिरा), विजय दगडु भोई (अपक्ष) (बादली), शामकांत रघूनाथ सनेर (अपक्ष) (ऑटो रिक्क्षा) सलीम कासम पिंजारी (अपक्ष) (ट्रॅम्पेट) असे आहेत.

धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात 12 उमेदवार आहेत. यात कुणालबाबा रोहिदास पाटील (इंडियन नॅशनल कॉग्रेस) (हात), आनंद जयराम सैंदाणे (बहुजन समाज पार्टी) (हत्ती), मनीषा अनील भिल (भारत आदिवासी पार्टी) (हॉकी आणि बॉल), राघवेंद्र (रामदादा) मनोहर पाटील (भारतीय जनता पार्टी) (कमळ), शिवाजी नथ्थु पाटील (अपक्ष), अमृतसागर संतोष पंढरीनाथ (अपक्ष) (किटली), शेख शफीक लुकमान कसाई (अपक्ष) (शिट्टी ),हिलाल (अण्णा) माळी (अपक्ष) (ऊस शेतकरी), राजेंद्र भगवान पाटील (अपक्ष) (ट्रम्पेट),(एकर कंडिशनर), श्रीकांत माधवराव कार्ले (अपक्ष) (बॅट), सुरेश मुरलीधर पाटील (अपक्ष) (खाट), सुनिता सोपान पाटील (अपक्ष) (रोड रोलर) असे आहेत.

शिरपूर विधानसभा मतदार संघात 6 उमेदवार आहेत. यात संदिप देविदास भिल (बागुल) (बहुजन समाज पार्टी) (हत्ती), काशिराम वेचान पावरा (भारतीय जनता पार्टी) (कमळ), गितांजली शशिकांत कोळी (अपक्ष) (बॅट), बुधा मला पावरा (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया) (कणीस आणि विळा), डॉ. जितेंद्र युवराज ठाकुर (अपक्ष) (ट्रम्पेट), ॲडव्होकेट वर्षा रमेश वसावे (अपक्ष) (शिट्टी) असे आहेत.