मुंबई : महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेले काँग्रेस , राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उबाठा यांनी फार्मुला ठरविला आहे. यानुसार या तिघा पक्षांना प्रत्येकी ८५-८५-८५ चे वाटप करण्यात आले आहे. तर या तिन्ही पक्षांनी आपआपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर देखील केली आहे. परंतु, महाविकास आघाडीतील इतर लहान पक्षांना अद्यापही जागांचे वाटप करण्यात आलेले नाही. या विलंबावरून समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अबू आझमी यांनी शरद पवार यांची भेट घेऊन पाच जागा देण्याची मागणी केली आहे. उद्यापर्यंत जागावाटप जाहीर न झाल्यास समाजवादी पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल, असा इशारा दिला आहे. तसेच पाच जागा न मिळाल्यास आपण २५ जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे करु, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत होणार उशिर हा चुकीचा असून जागावाटप उद्यापर्यंत जाहीर झालं नाही तर समाजवादी पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार. समाजवादी पक्षाचे पाच जागांवर उमेदवार जाहीर केले असून आम्हाला पाच जागा मिळाव्यात अशी विनंती मी शरद पवारांकडे केली. आम्हाला तितक्या जागा न मिळाल्यास आम्ही २५ जागांवर स्वातंत्र्य लढणार असल्याची घोषणा अबू आझमी यांनी केली आहे.
मी पाच उमेदवार दिले आहेत. मी वाट बघू शकत नाही. सरकार बनवायचं आहे. मात्र फार वेळ जात आहे. ही खूप मोठी चूक आहे. लोक या ठिकाणी अजून उभे आहेत. माझे २५ उमेदवार आहेत. मला यांनी सांगावे. नाहीतर मी लढतो. मविआच्या नेत्यांनी उत्तर द्यावे. कारण शेवटी हे लोक धोका देतात”, अशी भूमिका अबू आझमी यांनी मांडली. “दिल्ली येणे-जाणे सुरु आहे. दिल्लीवाले काय करतील? मी अध्यक्ष आहे. माझ्याकडे एबी फॉर्म आहे. मी हवा त्याला वाटून देणार. अनुशक्ती नगर, भायखळा, वर्सोवा या ठिकाणी उमेदवार आहेत. माझे उमेदवार शरद पवारांनी मागितले तर जातील”, असं अबू आझमी म्हणाले.