जळगाव । भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तथा जळगाव शहराचे सर्वांचे लाडके आमदार सुरेश भोळे उर्फ राजू मामा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व पक्षाने केलेले कार्य पाहता शुक्रवारी पिंप्राळा परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासह विविध पक्षाच्या सुमारे पन्नास कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार सुरेश भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष उज्जवलाताई बेंडाळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात सर्व नवनिर्वाचित कार्यकर्त्यांना पक्षाचा गमछा घालून प्रवेश निश्चित करण्यात आला. यावेळी उबाठा गटाचे पदाधिकारी निलेश पाटील यांचा प्रवेश झाल्यावर त्यांना भाजपा महानगर उपाध्यक्ष पद देण्यात आले.
येत्या काळात भारतीय जनता पक्षाचे कार्य हे जनतेच्या हितासाठी राहणार असून या कार्यात तरुणाईने देखील सक्रिय पद्धतीने सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार सुरेश भोळे यांनी यावेळी केले. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आण्णासाहेब राजपूत, एन.जे. पाटील, प्रेमसिंग राजपूत, नरेंद्र पाटील, प्रदीप राजपूत, भैय्यासाहेब राजपूत, भूषण कोळी, जीवन सपकाळे, किरणसिंग राजपूत, दत्तू धनगर, प्रितेश राजपूत, वैभव राजपूत यांचा समावेश आहे.
यांच्यासोबत उमेश राजपूत, हर्षल विसपुते, गौरव साळवे, यशवंत राजपूत, विशाल राजपुत, गौरव राजपूत, तुषार महाजन, दीपक पाटील यांसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे. प्रवेश कार्यक्रमास आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्षा उज्जवला ताई बेंडाळे, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर जळकेकर महाराज,मा अध्यक्ष दीपक सूर्यवंशी विधानसभा प्रचारक , श्री करोसिया ह भ प गणेश महाराज, प्रसिद्ध माध्यमसंपर्क प्रमुख मनोज भांडारकर यांसह मा नगसेवक विजय पाटील, अतुल बारी, सुरेश सोनवणे, मंडलाध्यक्ष शक्ती महाजन युवा मोर्चा नीलू आबा तायडे यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.