जळगाव : भारतीय जनता पक्षाचे तथा महायुतीचे जळगाव शहर मतदार संघांचे आमदार राजूमामा भोळे यांच्या विजयासाठी जणु संपुर्ण शहर एकवटत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आ. भोळे यांना भाजपाकडून सलग दोन आमदार झाले असून तिसऱ्यांदा ते निवडणूक लढवीत आहेत. आ. भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दररोज सामाजिक संघटना व राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय जनात पक्षात प्रवेश करत आहे.
विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राजूमामांचे नेतृत्त्व मान्य करीत भाजप एसटी मोर्चा महानगर जिल्हा यांच्या वतीने राजूमामा यांचे हात बळकट करण्यासाठी एकत्र येत आहेत. याच अनुषंगाने अनेक जणांनी आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
यात हरीविठ्ठलनगरातील ज्योती गायकवाड, नर्मदाबाई गायकवाड, निर्मला बोरसे, अनिता बोरसे, लक्ष्मी मोरे, पिंप्राळा येथील जिजाबाई मोरे, भारती ठाकरे, माेनिका सोनवणे, मिना वाघ, राजेंद्र केदार, संजु रंधे, विजय ठाकरे, रवी मोरे, आशिष तायडे, प्रशांत कांबळे, सचिन सोनार यांचा समावेश आहे.
यावेळी महानगर अध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, प्रवासी कार्यकर्ता जिल्हा ग्रामीण राजेश पटेल, माजी महापौर भारती सोनवणे, रेखा वर्मा ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू सोनवणे, एसटी मोर्चाचे महानगर अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, जिल्हा प्रसिद्धी माध्यम प्रमुख मनोज भांडारकर, मंडल क्रमांक २चे अध्यक्ष रवींद्र पाटील हे उपस्थित होते.
आमदार राजूमामा भोळे यांच्या विजयासाठी आता जळगाव शहरातील विविध समाजांनी बैठका घेऊन जाहीर पाठींबा दिला आहे. सामाजिक संपर्क अभियान अंतर्गत कंठहर वाणी समाजाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आमदार राजूमामा भोळे, खासदार स्मिता वाघ व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. याच प्रमाणे बारी समाज मेळावा देखील पार पडला.
चितोडे वाणी समाज यांची मतदान जनजागृतीसाठी व राजूमामांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी बैठक झाली. ही बैठक पद्मावती मंगल कार्यालयात पार पडली. याप्रसंगी खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सुवर्णकार समाजाची बैठक झाली. यावेळी समाज नेते विजयराव वानखेडे, संजय विसपुते, नगरसेविका रंजना वानखेडे व समाज पदाधिकारी व बांधव भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. भावसार क्षत्रिय समाजाची सामाजिक संपर्क अभियान अंतर्गत बैठक पार पडली. याप्रसंगी वक्ते म्हणून जळगाव ग्रामीणचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे, सीमा भोळे, मुकूंदराव मेटकर, महेश जोशी, जयेश भावसार, पितांबर भावसार आदी मान्यवर उपस्थित होते.
राजूमामांच्या विजयासाठी पिंप्राळा व रामेश्वर कॉलनी येथे धनगर समाजाच्या कॉर्नर बैठका झाल्या. यावेळी भागवतदादा भंगाळे, सुभाषभाऊ सोनवणे, पृथ्वीराज सोनवणे व धनगर समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. चीतोडे वाणी समाजाची बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष मोहन अकोले, उपाध्यक्ष हितेश वाणी, सचिव सुनिल वाणी, संचालक प्रवीण वाणी, दीपक दलाल, प्रकाश खारोले, रत्नाकर अग्रेसर, प्रभा वाणी, पल्लवी अकोले, वैशाली वाणी हे उपस्थित होते.
सामाजिक संपर्क अभियान अंतर्गत जळगाव शहर नाभीक समाज संस्थेच्या माध्यमातून भाजपा उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी व मतदान जागृती अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे, जिल्हा सचीव महेश जोशी, मुकूंदराव मेटकर, बंटी नेरपगारे, पृथ्वीराज सोनवणे, माजी नगरसेवक कुंदन काळे, ऑल इंडिया सेना समाज सचिव राजकुमार गवळी, ईशी दादा (नाभिक हितवर्धक संघ अध्यक्ष) मोहनराव सोनवणे-पिंप्राळा अध्यक्ष, जगदीश वाघ-नाभिक समाजाध्यक्ष, जिल्हा सचिव सुधा सोनवणे , भाजपा पदाधिकारी अरुण श्रीखंडे व अनेक समाज बंधू भगिनी उपस्थित होते.