धरणगाव : महाराष्ट्र विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २२ तारखेपासून विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. आज गुरुपुष्यामृतच्या च्या मुहूर्तावर मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज धरणगाव तहसील कार्यलयात दाखल केला.
महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या पार्श्वभूमीवर आज गुरुवार २४ रोजी महायुतीचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील हे यांचा उमेदवारी अर्ज गुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर धरणगाव येथे भरला. अर्ज दाखल करण्यापूर्वी ना. गुलाबराव पाटील यांनी रॅली काढत शक्तिप्रदर्शन केले. दरम्यान, आज सकाळी अकरा वाजता येथील ग्रामदैवत श्री बालाजी भगवान मंदिरात विधीवत पुजन करुन हजारोचा संख्येत वाजत गाजत शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य रॅली काढण्यात आली. यानंतर पाळधी येथून हजारो कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी रॅली काढली. यावेळी तालुक्यात विविध ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या रॅलीचे उत्सहात स्वागत करण्यात आले.
मंत्री गुलाबराव पाटील यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थिती होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेना शिंदे गटातर्फे पाळधी ते धरणगावपर्यंत मोठ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थित रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात येत आले. याप्रसंगी महायुतीचा विजय असो, गुलाबराव पाटील तुम आगे बढो चा गगनभेदी घोषणा देत तहसील कार्यालयाजवळ रॅलीचा सभेत रूपांतर करण्यात आले.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी ना. गिरीश महाजन, खा.स्मिता वाघ, सुभाष पाटील. सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील. भाजपाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, भाजपचे उपाध्यक्ष संजय महाजन, पी. सी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह महयुतीचा पदाधिकारी व असंख्य सेना भाजप राॅकाॅचे कार्यकर्ते उपस्थित होते.