---Advertisement---

Assembly Election 2024 : मनसेला खिंडार – जिल्हा उपाध्यक्षांसह कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

by team
---Advertisement---

जळगाव : गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वामुळे उमाळा येथे भव्य रॅलीनंतर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज घुगे व त्यांचे समर्थकांनी तसेच नशिराबाद व धानवड येथिल कार्यकर्त्यांनी शिवसेनेत सामील झाले. गुलाबराव पाटील यांनी या प्रसंगी सांगितले, “शिवसेना ही जनतेच्या सेवेसाठी कायम पुढे आहे आणि नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करतो. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, “गुलाब भाऊंचे कणखर आणि पारदर्शी नेतृत्व आमच्या विश्वासाचे कारण आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्षाच्या यशासाठी कटिबद्ध राहू.” अशी ग्वाही दिली.

यांचा झाला प्रवेश
उमाळा येथे भव्य रॅलीनंतर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज घुगे व त्यांचे समर्थकांनी तसेच नशिराबाद येथील भोई समाजाच्या विजय भोई, भूषण भोई, राहुल भोई, मोहन भोई, संदीप मोरे, निलेश भोई, अर्जुन भोई, गणेश भोई यांच्यासह सुमारे 50 भोई समाजाच्या युवकांनी व कार्यकर्त्यांनी तसेच धानवड येथील सुमारे 40 कार्यकर्त्यांनी गुलाबभाऊंचे नेतृत्व स्वीकारून शिंदे सेनेत प्रवेश केला. यात सुरेश चव्हाण, सुनील राठोड, किशोर चव्हाण, गणेश चव्हाण, किशोर राठोड, रामचंद्र चव्हाण,किरण चव्हाण, श्याम राठोड, अंकुश जाधव, नामदेव चव्हाण, नितीन राठोड यांच्यासह नशिराबाद, चिंचोली व धानवड येथिल एकूण १६० कार्यकर्त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रवेश देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. “गुलाब भाऊंचे कणखर आणि पारदर्शी नेतृत्व आमच्या विश्वासाचे कारण आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्षाच्या यशासाठी कटिबद्ध राहू.”

यावेळी माजी महापौर ललित कोल्हे, महानगर प्रमुख कुंदन काळे, आशुतोष पाटील, गणेश सोनवणे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, विकास धनगर, चेतन बऱ्हाटे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment