Assembly Election 2024 : छत्रपती गृप जळगाव शहर संघटनेच्या शंभरहून अधिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जळगाव : विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने जळगाव शहर विधानसभा मतदार संघांत विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यादिवसापासून विविध सामाजिक संघटना ह्या आमदार राजूमामा भोळे यांना पाठिंबा देत आहे. आ. भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पाठिंबा देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच इतर राजकीय व सामाजिक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. याचप्रमाणे रविवारी छत्रपती गृप जळगाव शहर यांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश जी. एम. फाउंडेश कार्यलयात आ. राजुमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थित रविवार, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी पार पडला.


भारतीय जनता पक्षात छत्रपती गृप जळगाव शहर यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. यावेळी आ. भोळे यांनी सर्वांच्या गळ्यात भारतीय जनता पक्षाचे मफलर टाकून प्रवेश दिला. या प्रवेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये गौरव गायकवाड, सनी कोळी, कुणाल अडकमोल, पवन सोनवणे, जितेंद्र सोनवणे ,बापू गायकवाड, रोहित नाईक, बॉबी बाविस्कर, प्रमोद जोशी, कपिल तायडे, परेश तायडे, विशाल सोनवणे, समाधान सोनवणे, गणेश सोनवणे, संजय सहानी, लखन हिराणी यांच्यासह 100 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष उज्वला बेंडाळे, प्रदेश चिटणीस रेखा वर्मा, जळगाव मनपाचे माजी स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील, विक्रांत तरसोडिया, राजेंद्र सोनवणे, मनोज भांडारकर ,युवा मोर्चाचे अध्यक्ष महेश पाटील,अक्षय जेजुरकर, निलेश तायडे, अशोक राठी, अमित काळे आदी उपस्थित होते.