Assembly Election 2024 : जळगावात आ. सुरेश भोळेंचा “मॉर्निंग वॉक” प्रचार, नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

जळगाव : जळगाव शहर मतदार संघांत महायुतीतर्फे आ. सुरेश भोळे हे निवडणूक लढवित आहेत. आमदार भोळे हे तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणांत उतरले आहेत. आमदार भोळे यांनी त्यांच्या कार्यकाळात शहरात विविध विकास कामे केली. त्यांची उमेदवारी जाहीर होताच नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. सुरेश भोळे हे भारतीय जनता पक्षाकडून तिसऱ्यांदा निवडणुकीत रिंगणांत आहेत. जळगाव शहर मतदार संघातून नागरिकांनी त्यांना २०१४ साली प्रथम आमदार म्हणून निवडून दिले. दरम्यान त्यांनी प्रचारातही आघाडी घेतली असून नागरिकांना प्रत्यक्ष भेटत आहेत. सकाळी मॉर्निग वॉकपासून नागरिकांच्या भेटीगाठी सुरु झाल्या आहेत.

शहरातील विविध उद्यानामध्ये शनिवारी पहाटे आ. सुरेश भोळे यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजयी करण्यासाठी आवाहन केले. नागरिकांनी प्रतिसाद देऊन सकारात्मकता दर्शवली.

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून आ. सुरेश भोळे हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. शनिवारी पहाटे शहरातील प्रसिद्ध भाऊंचे उद्यान, बहिणाबाई उद्यान आणि सागर पार्क मैदानावरील परिसरातील आलेल्या नागरिकांशी आ. भोळे यांनी भेट घेऊन संवाद साधला. यावेळी नागरिकांनी शहरातील विविध प्रश्नांविषयीच्या आ. सुरेश भोळे यांच्याशी चर्चा केली.

जळगाव शहरातील विविध विकास कामांबाबत नागरिकांनी आ.सुरेश भोळे यांच्याजवळ समाधान व्यक्त केले. तसेच मतदार संघातील यंदाही उर्वरित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. भोळे यांच्या पाठीशी कायम राहू अशी ग्वाही नागरिकांनी याप्रसंगी दिली. गेल्या पंचवार्षिक काळात शासनाच्या विविध योजनांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला, अशी माहिती यावेळी नागरिकांनी दिली.