Assembly Election 2024 : वैशाली सूर्यवंशी यांनी शक्तिप्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज

पाचोरा : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांनी आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी आपला अर्ज दाखल केला. तत्पूर्वी रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी गुरुकुल स्कुल जवळ, सिंधी कॉलनी, वरखेडी रोड येथून रॅलीस सुरुवात झाली. या रॅलीपूर्वी घेण्यात आलेल्या सभेत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, वैशाली सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. यात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे मतदारांना आवाहन केले. तसेच उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांनी पाचोरा-भडगाव मतदार संघातील सिंचनाच्या प्रश्नासह इतर प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

ही जाहीर सभा संपल्यानंतर पाचोरा शहरात महाविकास आघाडी व शिवसेना ठाकरे गटाकडून रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करत करण्यात आले. ही रॅली श्रीराम नगर , वरखेडी नाका, कृष्णपुरी, आठवडे बाजार , गांधी चौक, शिवसेना कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आले. या रॅली दरम्यान, विविध घोषणा देण्यात आल्या. वैशाली सूर्यवंशी यांनी पाचोरा तहसील कार्यालयात आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारीअर्ज दाखल केला केला.

पाचोरा मतदार संघांत महायुतीचे विद्यमान आमदार किशोर पाटील हे उमेदवार आहेत. तर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी अमोल शिंदे हे देखील अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागल्याचे चित्र दिसत आहे. अमोल शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघातील ही लढत रंजक ठरणार आहे. आमदार किशोर पाटील , अमोल शिंदे व वैशाली सूर्यवंशी यांच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार आहे याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.