---Advertisement---
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने घटक पक्षातील प्रमुख पक्षांनी आतापर्यंत आपले उमेदवार घोषित केले आहेत. यानुसार निवडणुकीतील महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला आहे. परंतु, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. जागा वाटपात उशीर होत असल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी ५ ठिकाणी आपले उमेदवार दिल्याने दोन उमेदवार असणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे ९६ उमेदवारांनी त्यांना मिळालेल्या एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. यानुसार उमेदवारी अर्ज आज शेवटच्या दिवसापर्यंत दाखल करण्याची लगबग दिसून आली.
महाविकास आघाडीच्या फार्म्युल्यानुसार महाविकास आघाडीत सर्वाधिक १०२ जागा काँग्रेस पक्ष लढवीत आहे. त्यांच्या खालोखाल शिवसेना उबाठा गट ९६ तर काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने ८७ जांगांवर आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. या तिघं पक्षांच्या मिळून २८५ जागा होतात. यात ५ ठिकाणी दोन पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. म्हणजे २८० जागांवर हे तिघा पक्षांची लढत होणार आहे. तर ऊर्वरीत ८ जागा मित्र पक्षांसाठी सोडल्याचे चित्र दिसत आहे.
यात महाविकास आघाडीच्या फार्म्युल्यानुसार महाविकास आघाडीत सर्वाधिक १०२ जागा काँग्रेस पक्ष लढवीत आहे. त्यांच्या खालोखाल शिवसेना उबाठा गट ९६ तर काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने ८७ जांगांवर आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. या तिघं पक्षांच्या मिळून २८५ जागा होतात. यात ५ ठिकाणी दोन पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. म्हणजे २८० जागांवर हे तिघा पक्षांची लढत होणार आहे. तर ऊर्वरीत ८ जागा मित्र पक्षांसाठी सोडल्याचे चित्र दिसत आहे.
यात सोलापूर दक्षिणच्या जागेवर उबाठा शिवसेनेतर्फे अमर पाटील हे उमेदवारी करत आहेत. असे असतांना याच जागेवर काँग्रेस नेते तथा माजी आमदार दिलीप माने इच्छुक असल्याने काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. परंतु, काँग्रेसने त्यांना एबी फॉर्म न दिल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये निराशा दिसून येत आहे. कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदे आणि काँग्रेसवर रोष व्यक्त केला.
---Advertisement---