अमळनेर : गुरुवार व गुरुपुष्यामृत या मुहूर्तावरती मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज गुरवार , २४ रोजी दाखल केला. विधानसभेच्या निवडणुकीचा उमेदवारीचा अर्ज भरण्यास जाण्यापूर्वी मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या मातोश्री व पत्नी तसेच कुटुंबातर्फे त्यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी मंत्री पाटील यांनी आपल्या आईसह पूर्वजांचे व देवी देवतांचे घेतले आशीर्वाद घेतले.
अमळनेर विधानसभा मतदार संघासाठी गुरुपुषमृत मुहूर्तावर मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी उमेदवारी आपला अर्ज दाखल केला. तत्पूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. या रॅलीत मत महायुतीला दिशा सक्षम महाराष्ट्राला अशा विविध घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करतांना अमळनेर मतदार संघातील मतदारांमध्ये ज्या पद्धतीने उत्साह बघायला मिळत आहे. मला असं वाटतं हा जरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची वेळ रॅली असली तरी विजयी मिरवणुकीमध्ये परावर्तीत झाल्याचे आज पाहावयास मिळत आहे. मला माझ्या मतदार संघातील मतदार बंधू भगिनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याचा मला अभिमान वाटतो. विकासाचं पर्व पुढे न्यायचे आहे. या विकासाच्या पर्वांत सर्वांचा खारीचा कोणाचा सिंहाचा वाटा असेल. महायुतीच्या नेते, कार्यकर्ते यांनी अमळनेर मतदार संघांत मला पाठिंबा दिला यामुळे या सर्वांचे आभार मानतो.
पाडळसरे धरण, अमळनेर शहराच्या पिण्याच्या पाण्याची योजना, अनेक रस्ते, भविष्यात शासकीय एमआयडीसी आली पाहिजे या जनतेच्या अपेक्षा पुढील पाच वर्षात पूर्ण करेल. हा तालुका अवर्षणप्रवण तालुका असल्यामुळे या तालुक्याच्या नशिबात असलेला जिराईत हा शब्द लिहिला आहे तो बागायतमध्ये बदलल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
या रॅलीत खासदार स्मिता वाघ यांच्यासह महायुतीचे पक्षातील पदाधिकारी देखील सहभती झाले होते. यावेळी, खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले की, महायुतीतर्फे ना. अनिल पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली नसून ही विजयाची रॅली असल्याचे दिसून येत आहे.