मुंबई : राज्य विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. याचप्रमाणे राष्ट्रवादी पक्षाचा जाहीरनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात, महिला सुरक्षा, शेतकरी,लाडकी बहीण यासह इतर घटकांना आश्वासन देण्यात आले. यात लाडकी बहीण योजनेअंतर्गंत मिळणारे पैसे १५०० वरुन वाढवून २१०० करणार असल्याचे या जाहीरनाम्यात स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबत वृद्ध व्यक्तींना देखील पेन्शन दिली जाईल असावं असे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, सुनील तटकरे यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करतांना सांगितले की, महायुतीच्या माध्यमातून जे काम केलं ते लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. मागील चार महिन्यात काही योजना आणल्या. यात लाडकी बहीण योजना, आर्थिक दुर्बल घटकातल्या मुलींच्या शिक्षणासाठी पैसे देण्याच्या योजनांचा समावेश आहे. या योजनांना प्रतिसादही मिळाला.
राष्ट्रवादीचा तालुकास्तरीय जाहीरनामा प्रसिद्ध करत आहे. स्थानिक पातळीवरच्या जाहीरनाम्यात आमदारांचं काम मांडलेलं असेल. आम्ही हेल्पलाइन सुरू केली त्याला २५ लाख कॉल आले. आता टोल फ्री नंबरवर कॉल करून तालुका स्तरीय जाहीरनामाही जनतेला ऐकता येईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे
धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजर रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.
लाडकी बहिण योजने संदर्भात बहिणींना दीड हजर नाही तर तबल 2100 रुपये देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात 45 हजार पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेला आहे. सोबत महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांना पोलिस दलात समावेश करण्याचा वादा करण्यात आला आहे
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेती पिकांच्या एम.एस.पी वरती 20% अनुदान देण्याचा वादा अजित दादांच्या पक्षाकडून करण्यात आलेला आहे.
दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतनाचा वादा करण्यात आलेला आहे.
वीज बिलात 30% कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा वादा करण्यात आला आहे.
25 लाख रोजगार निर्मितीचा वादा देखील केला आहे.
वृद्ध पेन्शन धारकांना आता पंधराशे वरुण महिन्याला 2100 रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.