जळगाव : येथील जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा उर्फ सुरेश दामू भोळे यांनी शनिवारी दि. ९ रोजी सकाळी अयोध्या नगर परिसर, अशोक नगर, विद्यानगर, रामचंद्र नगर भागात नागरिकांशी संवाद साधून विजयासाठी शुभाशीर्वाद घेतले. एका वृद्ध महिलेने, “राजूभाऊ, आता माह्या घरी येशीन तर लाल दिव्याच्या गाडीतच येजो रे भौ…” म्हणत शुभाशीर्वाद दिले. या महिला भगिनीच्या प्रेमामुळे आ. राजूमामा भोळे भारावून गेले.
आ. राजूमामा भोळे यांनी शनिवारी अयोध्या नगर येथील मनुमाता मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली. तेथून हॅपी होम कॉलनी, सोपानदेव नगर, रामचंद्र नगर, महादेव मंदिर परिसर, अशोक नगर, गीताई नगर, साईबाबा मंदिर परिसर, सिद्धिविनायक विद्यालय परिसर मार्गे रामचंद्र नगरातील हनुमान नगरात प्रचाराचा समारोप केला. परिसरातील श्री विश्वकर्मा मंदिरात महिला भगिनींनी, स्वागतम मामा…सुस्वागतम मामा… गीताने स्वागत करून औक्षण केले. भगवान श्री विश्वकर्माचे आ. भोळे यांनी दर्शन घेतले.
यानंतर विशाल कोल्हे, सुनील सरोदे, प्रदीप रोटे, विजय वानखेडे, शालिक चौधरी आदींच्या घरी सदिच्छा भेट देऊन आशीर्वाद घेतले. खा. स्मिता वाघ यांनी प्रचारात उपस्थिती देऊन महिला भगिनी व नागरिकांना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी रिपाई व महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहण्याचे नागरिकांना आवाहन केले.
रॅलीमध्ये खा. स्मिता वाघ, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, मंडळ क्रमांक ३ चे अध्यक्ष सुनील सरोदे, माजी उपमहापौर सुनील खडके, माजी नगरसेवक डॉ. वीरेन खडके, रंजना वानखेडे, विजय वानखेडे, माजी महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, कैलास सोनवणे, दीप्ती चिरमाडे, संतोष इंगळे, किसन मराठे, बंटी भारंबे, ललित भोळे, सचिन भोळे, प्रकाश पाटील, आकाश भोळे, प्रकाश चौधरी, प्रदीप रोटे, पी. टी. दुसाने, वासुदेव भंगाळे, ॲड. दीपकराज खडके, सोहन खडके, कुणाल खडके, निळकंठ खडके, मंजुळा मराठे, सीमा वाणी, मंगला खडसे, मनीषा रोटे, भावना लोखंडे, योगेश डोळे, योगेश निंबाळकर, शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट दिलीप पोकळे, ज्योती चव्हाण, कुंदन काळे, हर्षल मावळे, शंतनु नारखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विनोद देशमुख, अर्चना कदम, ममता तडवी, रिपाई आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, प्रताप बनसोडे, मिलिंद अडकमोल, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू मोरे, महानगर जिल्हाध्यक्ष कल्पेश मोरे, संजय सोनवणे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.