Assembly Election : महर्षी वाल्मिकी नगर, मालुसरे नगर, जैनाबाद आ. राजूमामांच्या स्वागतासाठी सजले..!

जळगाव : शुक्रवारी प्रचारातील पहिल्या टप्प्यात महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या स्वागतासाठी शहरातील महर्षी वाल्मिकी नगर, मालुसरे नगर, जैनाबाद, मेस्कोमाता नगर सजल्याचे चित्र सकाळी दिसून आले. गल्लीबोळात रांगोळ्या,फुले,पाकळ्यांच्या वर्षावात महिलांच्या औक्षणासाठी रांगा लागल्या होत्या. प्रत्येक भगिनी, भाचीचा ओवाळण्याचा हट्ट आ.राजूमामांनी पुरविला. लहान मुले, तरुण, महिला सर्वच वर्गातील नागरिकांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावरील प्रेमवर्षाव पाहून आ. भोळेंना आनंदाश्रू आवरता आले नाही.

शुक्रवारी दि. १५ रोजी पहिल्या टप्प्यात महर्षी वाल्मिक मंदिर येथे अभिवादन करून आ. राजूमामा भोळेंनी प्रचाराला सुरुवात केली. तेथून महर्षी वाल्मिक नगर, जैनाबाद, तानाजी मालुसरे नगर, दिनकर नगर, गुरुदत्त कॉलनी, मेस्को माता नगर परिसर, श्रीराम कॉलनी, दशरथ नगर, तळेले कॉलनी मार्गे माजी नगरसेविका रंजना भरत सपकाळे यांच्या घराजवळ समारोप झाला. रॅली मार्गात सर्व कष्टकरी, श्रमीक वर्गातील नागरिकांनी आ. भोळेंचे स्वागत करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी विविध मान्यवरांच्या घरी आ. राजूमामा भोळे यांनी भेट दिली.

रॅलीत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, शिवसेनेचे महानगर संघटक ॲड. दिलीप पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, रिपाई (आठवले) गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, कांचन सोनवणे, भारती सोनवणे, रंजना सपकाळे, भाजप मंडळ क्रमांक २ चे अध्यक्ष राहुल घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला महानगराध्यक्ष मीनल पाटील, भाजपचे गीतांजली ठाकरे, निलेश तायडे, शुभम तायडे, शालिक सपकाळे, भरत कोळी, जिभाऊ वानखेडे, जयेश भावसार, सागर पाटील, गणेश बाविस्कर, अजय सोनवणे, आकाश इंगळे, आकाश रायसिंगे, अनिल पाटील, चेतन कोळी, पंकज सोनवणे, मनोज रायसिंगे, मीना बाविस्कर, वैशाली बाविस्कर, वैशाली पाटील, ॲड. शारदा सोनवणे, दीपक कोळी, चेतन शर्मा, अनिता राणे, रेखा कुलकर्णी, कल्पेश सोनवणे, शिवसेनेचे उमेश सोनवणे, पुष्पा तळेले, सुषमा चौधरी, आरती नाईक, भारती रंधे, नीला पवार, ममता जंजाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक लता मोरे, अर्चना कदम, ममता तडवी, शोभा भोईटे, रिपाई (आठवले) गटाचे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, अक्षय मेघे, लोक जनशक्ती पक्षाचे मनोज निकम, आनंदा सोनवणे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.