जळगाव : महायुतीमधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. ते मतदार संघात विविध भागात प्रचार करत आहेत. आज, मंगळवार, १२ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आमदार सुरेश भोळे यांची भेट घेतली, यावेळी व्यापारी, भाजी विक्रेते, घाऊक विक्रेते यांनी आमदार भोळे यांना ‘तुमच्या पाठीशी असून पुन्हा एकदा आपणच निवडून याल’ अशी विजयाची खात्री दिली.
या प्रचार रॅलीत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पूर्ण परिसर आमदार भोळे यांनी पिंजून काढला. रॅलीत सर्व व्यापारी वर्ग यांनी पुष्पहार घालून मिठाई भरवत आमदार भोळेंचे बाजार समितीमध्ये स्वागत केले. याप्रसंगी महायुतीच्या विविध घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीत आमदार राजूमामा भोळे यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. यावेळी एका महिला भगिनीने आ. राजूमामा भोळे यांना कानात विजयाची गोष्ट सांगून आश्वस्त केले. रॅलीमध्ये मंडळ क्रमांक ८ चे अध्यक्ष महादू सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, माजी नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, विनोद मराठे, संजय महाजन, अशोक राठी, हेमंत नेमाडे, भरत कर्डिले यांसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.