Assembly Election 2024 : आ. राजूमामा भोळे यांना स्वस्तिक भजनी मंडळ परिवाराचा पाठिंबा

जळगाव :   जळगाव शहर विधानसभा मतदार संघातील महायुती तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आ.राजूमामा भोळे यांच्या प्रचाराला मोठ्या थाटात सुरुवात करण्यात आली. आ. भोळे यांच्या प्रचार दौऱ्याचे आज मंगळवारी दि. ५ नोव्हेंबर रोजी जुन्या जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले. त्यांच्या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. आ. भोळे यांचे ठिकठिकाणी औक्षण करून तसेच पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच त्यांना विजयासाठी शुभेच्छा देण्यात येत आहे. याच अनुषंगाने शहरातील स्वस्तिक भजन मंडळाने आ. भोळे यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे पात्र दिले आहे. आ. भोळे यांनी मागील १० वर्षांत केलेल्या विकास कामांचे स्वस्तिक भजन मंडळाने कौतुक करत आपला पाठींबा जाहीर केला आहे.

आ. भोळे यांना विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे. जळगाव शहरात शनिपेठ परिसरात स्वस्तिक भजन मंडळ आहे. या भजन मंडळ परिवाराने महायुती तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्याचे पत्र त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आ.राजूमामा भोळे यांना दिले आहे.

या पाठिंबा पात्रात स्वतिक भजन मंडळाने म्हटले आहे की, आपणाकडून नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रोत्साहन मिळत असल्याने, आम्ही स्वस्तिक भजन मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्यातर्फे आपले आभार मानतो. तसेच मागील १० वर्षात जळगावमध्ये जे विकास कार्य आपण घडवून आणले व यापुढे पण जळगाव मतदारसंघात विकास कार्य थांबणार नाही याची आम्हाला खात्री आहे, असे पत्रामध्ये स्वस्तिक भजनी मंडळ परिवार यांनी म्हटले आहे.

आगामी विधानसभा निवडणूकीत भरघोस मतांनी आपणास विजय प्राप्ती व्हावी यासाठी स्वस्तिक भजन मंडळातर्फे आपणास शुभेच्छा देत आहे. या पत्राद्वारे स्वस्तिक भजन मंडळ व परिवार आपणास पाठिंबा देत आहे, असे देखील पत्रामध्ये म्हटले आहे.