Devendra Fadnavis: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण! शरद पवारांच्या मागणीवर फडणवीसांचे प्रत्युत्तर, वाचा काय म्हणाले?

Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्रे भागातील निर्मल नगरमध्ये गोळ्या झाडत हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी देखील झडत आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत राजीनाम्याची मागणी केली होती. शरद पवार यांच्या या मागणीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत आपल्या शैलीत विरोधकांची बोलती बंद केली आहे.

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधान आहे आहे. गंभीर अशी ही घटना असाताना प्रत्येक जण आपली राजकीय पोळी शेकू पाहत आहे. यात मागे राहतीत ते शरद पावर कुठे? त्यामुळे या प्रकरणाच्यानिमित्ताने शरद पवार यांनी बिनबुडाचे आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. शरद पवार यांच्या बिनबुडाच्या आरोपांचा समारोप घेत फडणवीसांनी शरद पवारांना आरसा दाखविला आहे.

शरद पवार यांच्या मागणीला प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार साहेबांना, या वयात सत्ता पाहिजे आहे. एवढी गंभीर घटना झाली असून सुद्धा त्यांना खुर्ची पाहिजे. आम्हाला महाराष्ट्र टिकवायची आहे, सावरायचा आहे तर त्यांना खुर्ची पाहिजे. त्यांनी खुर्चीचचं पाहाव आम्ही महाराष्ट्र पाहतो, असा खोचक टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला.

तसेच पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, बाबा सिद्दीकी यांची हत्या ही अतिशय दुखद आणि गंभीर घटना आहे, बाबा सिद्दिकी यांच्या सोबत मी काम केलं आहे. त्यांच्याशी माझी निकटची मैत्री होती. घडलेल्या प्रकारामुळे आम्हाला सर्वांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणातील दोन आरोपी पकडले असून त्यांची चौकशी सुरू आहे. काही धागेदोरे मिळत आहेत. काही अँगल देखील या प्रकरणात समोर आले आहेत. अशा परिस्थितीत शरद पावार साहेबांचं वक्तव्य चुकीचे आहे. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्चा आहे, आमच्या नजरेसमोर महाराष्ट्र आहे, आम्हाला महाराष्ट्र पाहायचा आहे, राज्याचा विकास करायचा आहे. राज्याची सुरक्षा पाहायची आहे. त्यामुळे ते खुर्चीकडे पाहतायत, त्यांनी खुर्चीकडे पाहावं आणि हवं ते बोलावं, असंही देवेंंद्र फडणवीस म्हणाले.