मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने नागपाडा आणि कामाठीपुरा परिसरात छापा टाकून चार जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असून, तिघी महिला बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे या बांगलादेशी महिलांपैकी एका महिलेने लाडकी बहीण योजना अंतर्गत मिळणारा लाभ घेतल्याचा दावा तिच्या वकिलांनी केला आहे. मात्र, या दाव्याला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.
घुसखोरी व मतदानाचा आरोप
गुन्हे शाखेच्या तपासात असेही उघड झाले आहे की, अटक केलेल्या घुसखोरांनी विधानसभा निवडणुकीत मतदानही केले आहे. या महिलांना बांगलादेशी एजंटमार्फत भारतात घुसवण्यात आले होते, याप्रकरणी महादेव यादव यालाही आश्रय आणि रसद पुरवून बेकायदेशीर स्थलांतर करण्यास मदत केल्याबद्दल अटक केली आहे.
लाडकी बहीण योजनेचा गैरवापर?
अटक केलेल्या महिलांपैकी एक उर्मिला ही २३ वर्षीय महिला आहे. तिला विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते मिळाले आहेत. पोलिसांनी तिचे आधार कार्ड बनावट असल्याचे सांगितले.
पोलिसांनी अटक केलेल्या माहिलेकडे आधार कार्ड आणि काही कागदपत्रे सापडली. या महिलांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड बनवून मुंबईत राहत होत्या, अशी माहिती समोर आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तिन्ही महिलांनी विधानसभा निवडणुकीत मतदान देखील केले होते अशी ही माहिती समोर आली. आरोपी उर्मिला खातूनचे वकील यांनी आशिल बांगलादेशी नाही, कारण गेल्या विधानसभा निवडणुकी पूर्वी नोव्हेंबरपासून तिच्याकडे भारतीय आधार कार्ड आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत तिची नोंदणी झाली आहे असा पांडे यांनी दावा केला आहे.