Fake birth certificates in jalgaon : राज्यात २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान मोठ्या प्रमाणात अपात्र लोकांनी बनावट जन्मदाखले मिळविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर चौकशीअंती राज्यात १७ ठिकाणी गुन्हे दाखल झाले आणि या फसव्या, बनावट दाखल्यांचा घोटाळा सहा म हिन्यांत समोर आला, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी (८ एप्रिल) जळगाव येथे केला.
जळगावात बोगस व बनावट स्वाक्षरीने खोटे जन्मदाखले घेतले गेले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. या पार्श्वभूमीवर सोमय्या हे दुपारी साडेतीनच्या सुमारास येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आले होते. त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेत तब्बल तासभर त्यांच्या दालनात बंदद्वार या गंभीर प्रकरणाबद्दल डॉ. रेड्डी यांच्याशी चर्चा केली. या वेळी भाजपचे काही पदाधिकारीही उपस्थित होते. ही चर्चा आटोपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सिल्लोडचे बांगलादेश कनेक्शन
पाच हजारांहून अधिक लोकांनी जन्मदाखला घेण्यासाठी केवळ आधार कार्ड हा पुरावा दिला आहे. सिल्लोड येथे बोगस दाखले घेणारे सर्वाधिक ९० टक्के मुस्लीम असून, त्यांचे बांगलादेश कनेक्शन आहे. या ठिकाणी त्यांचा मोठा प्रभाव आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला