धुळे : ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटात एक संवेदनशील मुद्दा मांडण्यात आला आहे. केरळमधल्या हजारो मुलींचं ब्रेनवॉश करून त्यांचं धर्मांतर केलं जातं आणि त्यानंतर दहशतवादाच्या रॅकेटमध्ये अडकवलं जातं. ‘लव्ह जिहाद’ आता आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. पालकांनी हा जिहाद सजग राहून परतविला पाहिजे , अशी साद ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाचे निर्माते विपुल शहा यांनी घातली. सध्या केरळमध्ये असे षडयंत्र सुरू आहे आणि अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले,
केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करून कशा पद्धतीने दहशतवादात सामील करून घेतले, याविषयीची कथा असलेला गाजलेला चित्रपट ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाचे निर्माता विपुल शहा हे ‘स्टोरी बिहाईंड केरला स्टोरी’ या विषयावर व्याख्यानात बोलत होते. सर्जना मीडिया सोल्यूशन्स प्रा. लि. जळगाव तरुण भारततर्फे धुळे शहरातील मालेगाव रस्त्यावरील हॉटेल कृष्णाईमध्ये शनिवारी 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी व्याख्यानाचा कार्यक्रम झाला.
‘द केरल स्टोरी’ चित्रपटात एक संवेदनशील मुद्दा मांडण्यात आला आहे. केरळमधल्या हजारो मुलींचे ब्रेनवॉश करून त्यांचे धर्मांतर केले जाते आणि त्यानंतर दहशतवादाच्या साखळीत अडकविले जाते. या चित्रपटात अशाच तीन मुलींची कथा दाखविण्यात आली आहे. चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बेलानी, सिद्धी इदनानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करून कशा पद्धतीने दहशतवादात सामील करून घेतले, याविषयीची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.
निर्माते शहा म्हणाले की, एका ख्रिश्चन मुलीच्या प्रकरणात लव्ह जिहाद हिंदू धर्माशी काहीही संबंध नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा होता; पण मी ते मानायला तयार नव्हतो. देशात काही लोक इतके द्वेषाने आले आहेत की ते लोकांचे किंवा मुलींचे जीवन उद्ध्वस्त करू इच्छित नाहीत आणि आपण केरळमध्ये जाऊन अनेक मुलींना भेटलो. आतापर्यंत त्यांनी धर्मांतराचे काम केले आहे आणि त्यांच्यापैकी अनेकांना देश सोडून आश्रमात परत आणले आहे. जर तुमची मुलगी परत आली, तर तुम्हाला ठार मारले जाईल, अशा धमक्या आम्ही मुलाखती घेत ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून नोंदविल्या होत्या.
कुणाला आमिषे दाखवून लग्न करून, कुठेतरी मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले जाते. मग कुठे मुलीचे तुकडे फ्रीजमध्ये सापडतात. मात्र, प्रसिद्धिमाध्यमांकडून याचा विचार केला जात नाही. ते यावर काहीही लिहीत नाहीत. त्यामुळे अशी माहिती समाजापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे हे चक्र संपत नाही, वाढत आहे. आपण सध्या देशाच्या परिस्थितीवर खूश नाही, अशी खंतही त्यांनी सध्याच्या देशातील वास्तव परिस्थितीवर व्यक्त केली. केरळमध्ये एक हिंदू मुलगी हिजाबशिवाय बसमध्ये चढल्याची समाजमाध्यमांतून प्रसारित झालेली ध्वनिचित्रफीत लोकप्रिय आहे, असे निर्माते शहा यांनी सांगत लंडनमध्ये राहणारे पाकिस्तानी मुस्लिम कुटुंब आणि त्यांचा एक मुलगा आहे या विषयावरही 2007 मध्ये मी चित्रपट बनविला. त्याचे नाव ‘नमस्ते लंडन’ होते. या चित्रपटाची थोडक्यात पार्श्वभूमी निर्माते शहा यांनी सांगत माझ्याकडे लव्ह जिहादची खूप मोठी पार्श्वभूमी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
निवासी संपादक चंद्रशेखर जोशी यांनी प्रास्ताविकात दैनिक तरुण भारत राबवीत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
चित्रपटाबात शंका निर्माण करण्यात आली…
‘द केरल स्टोरी’ चित्रपट योग्य नाही, अशी शंका लोकांच्या मनात निर्माण करायची आहे की, त्यांचा एक लाखापेक्षा जास्त आकडा 32 हजार कसा दाखविला गेला आणि प्रसारमाध्यमही आमच्यामागे लागले. त्यासंदर्भात यूट्यूबच्या माध्यमातून ध्वनिचित्रफीत प्रसारित केली. ती अजूनही यूट्यूबवर उपलब्ध आहे; पण त्यावर कोणताही वाद झाला नाही, त्यावर चर्चा झाली नाही, त्यामुळे ती ध्वनिचित्रफीत लोकांपर्यंत पोहोचली नाही. आम्ही मुंबईत पत्रकार परिषद घेत 26 मुलींना बोलावले. कारण, आम्हाला विचारले जात होते की 32 हजारचा आकडा कुठून आला, काय झाले, कुठे आहेत, असे प्रश्न उपस्थित झाले. एवढ्या मुली, तर त्या मुलींनी व्यासपीठावरून कोणती गोष्ट सांगितली? आपल्या मुलांसोबत असे काहीतरी घडावे, अशी इच्छा आहे का?असा प्रश्न करीत निर्माते शहा यांनी तुम्हाला घर, कुटुंब मजबूत बनवावे लागेल, तरच आपण पुन्हा एक अतिशय सुंदर बनू आणि मजबूत समाज उदयास येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.