तुम्ही तुमच्या बचत खात्यात मोठ्या प्रमाणावर रोख व्यवहार करत असाल, तर आयकर विभागाचे नियम आणि मर्यादा लक्षात ठेवणे आवश्यक आहे. योग्य कागदपत्रे आणि माहितीची तयारी करणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. जर तुमचं बचत खाते असेल आणि तुम्ही त्यात रोख रक्कम जमा किंवा काढत असाल, तर आयकर विभागाचे काही महत्त्वाचे नियम तुमच्यासाठी लागू होतात. हे नियम तुमचं आर्थिक व्यवहार योग्य रीतीने व्यवस्थापित करण्यासाठी महत्त्वाचे आहेत.
₹10 लाख मर्यादा:
वित्त तज्ज्ञांच्या मते, एका आर्थिक वर्षात (1 एप्रिल ते 31 मार्च) तुमच्या बचत खात्यात जमा किंवा काढलेली एकूण रोख रक्कम ₹10 लाखांपेक्षा जास्त नसावी. जर तुम्ही ही मर्यादा ओलांडली, तर बँकेला या व्यवहाराची माहिती आयकर विभागाला द्यावी लागेल.
₹2 लाख रोख व्यवहारावर बंधन:
प्राप्तिकर कायद्याच्या कलम 269ST अंतर्गत, एका दिवसात ₹2 लाख किंवा त्याहून अधिक रोख रक्कम स्वीकारणे किंवा देणे गैरकायदेशीर ठरू शकते.
₹50,000 पेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास PAN माहिती आवश्यक:
जर तुमच्या बचत खात्यात एका दिवसात ₹50,000 किंवा त्याहून अधिक रक्कम जमा केली, तर तुम्हाला पॅन कार्डाची माहिती बँकेला देणे बंधनकारक आहे. पॅन नसेल तर तुम्हाला फॉर्म 60 किंवा 61 सबमिट करावा लागेल.
आयकर विभागाकडून नोटीस मिळाल्यास:
जर तुमचं आर्थिक व्यवहार उच्च-मूल्याच्या रोख व्यवहारांसाठी आयकर विभागाच्या दृष्टीने ध्यानी घेतले गेले, तर तुम्हाला निधीच्या स्त्रोताचे समर्थन करणारी कागदपत्रे सादर करावी लागतील. यामध्ये बँक स्टेटमेंट्स, गुंतवणूक नोंदी किंवा वारसा कागदपत्रांचा समावेश असू शकतो.
तज्ञांचा सल्ला घ्या:
तुम्हाला आयकर विभागाकडून उच्च-मूल्याच्या रोख व्यवहारांसाठी नोटीस मिळाल्यास किंवा तुम्हाला एखाद्या व्यवहाराबद्दल शंका असल्यास, अनुभवी कर सल्लागाराचा सल्ला घेणे योग्य ठरेल.