Beed Santosh Deshmukh Case : राज्याला हादरवून सोडणारी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाची घटना चर्चेची ठरत आहे. या खुनाच्या घटनेत राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्यांचे मारेकऱ्यासोबत संबंध असल्याचे बोलले जात असताना मंत्री मुंडे यांनी मुंबईतील पत्रकारांशी संवाद साधला. ते खाते वाटप झाल्यानंतर पहिल्यांदाच विभागाची बैठक घेत आहेत. त्यांनी सूचित केले की, मुख्यमंत्र्यांनी दिलेला 100 दिवसांचा कार्यक्रम पुढे राबविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
संतोष देशमुख खून प्रकरणावर प्रतिक्रिया:
माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी सांगितले की, संतोष देशमुख हत्याकांडातील सर्व आरोपींना फाशीची व्हावी अशी भूमिका मंडली. या खून प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा दिली जावी. हे केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालली पाहिजे. या हत्याकांडात राजकारण करण्यात येत असून त्यांचे नाव विनाकारण गोवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
बदनामीचे आरोप:
धनंजय मुंडे यांनी पुढे सांगितले की, त्यांच्यावर टीका करूनच काही लोक आपला दिवस चांगला करतात.त्यांची प्रतिमा मीडिया ट्रायलच्या माध्यमातून खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर टिकास्त्र सोडत मीडियाने सत्याचा शोध घ्यावा असे आवाहन केले.
वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत मुंडे यांनी सांगितले की, वाल्मिक कराडचे संबंध सुरेश धस आणि त्यांच्यासोबतही होते. मात्र ,आरोपी त्यांच्या किंवा कोणाच्याही जवळचा असला तरी त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, असे ठाम मत व्यक्त केले.
मी मंत्रपदाची शपथ घेल्यापासूनच माझ्यावर टिका करण्यात येत आहेत. मीडिया ट्रायलच्या माध्यमातून त्यांना समाजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा मंत्री मुंडे यांनी सांगितले.