जळगाव : जिल्ह्यत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. एमपीडीए कायद्यानुसार तिघांवर स्थानबद्धतेची ही कारवाई त्याच्यावर करण्यात आली आहे. पोलीस डायरीतील तीन गुन्हेगारांविरोधात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. यात विशाल चौधरी अमळनेर, सुनील पाटील पारोळा, तसेच जळगाव तालुक्यातील वैभव सपकाळे असोदा यांचा समावेश आहे. तिघांची पोलिसांनी कोल्हापूर व नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. जिल्हा पोलीस दलाची ही मोठी कारवाई म्हटली जात आहे.
विशाल दशरथ चौधरी (वय ३२,रा. भोईवाडा, अमळनेर) याच्या विरुध्द अमळनेर पोलीस ठाण्यात भादवी कायद्यांतर्गत सात गुन्हे, पारोळा पोलीस ठाणे हद्दीतील सुनील ऊर्फ सल्ल्या लक्ष्मण पाटील (वय २९, रा. अमळनेर रोड, पारोळा) याच्या विरुध्द विविध ११ गुन्हे तर वैभव विजय सपकाळे (वय १९, रा. असोदा) याच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. त्या त्या पोलीस ठाण्यामार्फत प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केले होते. एलसीबीने या तीनही प्रस्तावाचे अवलोकन करुन ते जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले. त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तिघांवर स्थानबध्दतेचे आदेश केले होते. त्यानुसार एकाची कोल्हापूर व दोघांची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.
अमळनेर पोलीस ठाण्याचे पोनि विकास देवरे, पोउनि भगवान शिरसाठ, पोहेकॉ किशोर पाटील, मिलींद सोनार, पोकॉ सिध्दांत शिसोदे यांनी. पारोळा पोनि सुनील पवार, पोउनि राजु जाधव, पोहेकॉ प्रवीण पारधी, सुनील हटकर, पोकॉ आशिष गायकवाड, विजय पाटील, महेंद्र पाटील यांनी तर तालुका पोलीस ठाण्याचे पोनि महेश शर्मा, पोउनि गणेश सायकर, पोहेकॉ प्रवीण पाटील, पोपट सोनार, विलास शिंदे, सुधाकर शिंदे यांनी याप्रकरणी कामकाज पाहिले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव भाग अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवालकर यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड त्यांचे अधिनस्त पोहेकॉ सुनील दामोदरे, पोहेकॉ जयंत चौधरी, पोहेकॉ रफिक शेख कालु, पोहेकॉ संदीप चव्हाण, पोकॉ ईश्वर पाटील यांनी एमपीडीए वरील प्रस्तावसंदर्भात कामकाज पाहिले.