जळगाव : शहरातील ओमशांतील नगरात अज्ञात चोरट्यांनी बंद घरातून रोकडसह मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी शुक्रवारी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगावात बंद घर चोरट्यांना पर्वणी
by team
Updated On: डिसेंबर 31, 2022 8:02 pm

---Advertisement---
शहरातील ओमशांती नगरात विजय रामदास तायडे हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. दि. 25 डिसेंबर रोजी ते घराला कुलूप लावून प्रयागराज येथे शालकाकडे गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी बंद घर असल्याचे पाहून घराचे कुलूप व कोयंडा तोडून घरातील कपटातून सोन्याचे दागिने व रोकड असा एकुण 70 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
विजय तायडे हे गुरूवारी सकाळी 5.30 वाजता घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी याबाबत रामांनदनगर पोलीस ठाण्यात कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली. याप्रकरणी विजय तायडे यांच्या फिर्यादीवरून 30 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.