---Advertisement---

Bhadgaon News: भारतीय जनता पार्टीचे कजगाव व भडगाव मंडळ अध्यक्ष जाहीर

by team
---Advertisement---

Bhadgaon News: भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्वांतर्गत कजगाव मंडलळाच्या अध्यक्षपदी अनिल मुरलीधर पाटील (वडजी) तर भडगाव मंडळाच्या अध्यक्षपदी प्रमोद देविदास पाटील (भडगाव पेठ) यांची निवड करण्यात आली आहे. पक्षांतर्गत झालेल्या या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी नाना सुकदेव पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी शितल देशमुख यांनी ही निवड घोषित केली.

सदर निवड प्रक्रीया भडगाव येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पार पडली. याप्रसंगी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचलन सरचिटणीस विनोद नेरकर यांनी केले. याप्रसंगी पहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व हिंदू बांधवांना तसेच माजी जि.प.सदस्य श्रावणतात्या लिंगायत यांच्या पत्नी स्व. सुनंदाताईंना सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

संघटनपर्व अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात प्राथमिक सदस्य, सक्रिय सदस्य नोंदणी, बुथ समिती गठन करण्याची प्रक्रीया जानेवारीपासून सुरू झाली आहे. त्यातीलच मंडळ अध्यक्ष निवड हा महत्त्वपूर्ण टप्पा होता. संपूर्ण महाराष्ट्रात एकाच पद्धतीने मंडळ अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पार पडली.

अनिल पाटील हे महाविद्यालयीन जीवनापासून अभाविपच्या कामात सक्रिय होते. १५ वर्षापासून भाजपात विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या असून सलग तीन टर्म सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. तर श्री. प्रमोद देविदास पाटील हे पण विद्यार्थी दशेपासून अभाविपच्या कामात सक्रिय होते. बुथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस, भाजपा शहर सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले आहे. अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले पक्षाशी प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना अध्यक्षपदी संधी मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


सदर निवडीबद्दल ना. गिरीश महाजन, खासदार स्मिताताई वाघ, संघटनमंत्री रवी अनासपुरे, आमदार मंगेश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, जिल्हा निवडणूक अधिकारी नंदुभाऊ महाजन, डॉ. राधेश्याम चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, माजी सभापती सुभाष पाटील, प्रदेश कार्यकारीणी निमंत्रित सदस्य अमोल नाना पाटील यांनी नवनियुक्त मंडळ अध्यक्षांचे अभिनंदन केले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment