---Advertisement---

Educational News : वर्षपूर्तीनिमित्त बहिणाबाई अभ्यासिकेत कार्यक्रम, ‘यांचा’ करणाऱ्यात आला सत्कार

by team
---Advertisement---

जळगाव : भालोद येथील बहिणाबाई अभ्यासिकेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याअंतर्गंत घेण्यात आलेल्या कार्यक्रमास कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.जयंत लेकुरवाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, गावागावात अभ्यासिका सुरू झाल्या पाहिजे.

डॉ. जयंत लेकुरवाळे पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1952 ला या संस्थेने चालविलेल्या शाळेला भेट दिली. त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी मी आपल्या अभ्यासिकेच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे, हे माझ्यासाठी गौरवाचे आहे. वाचनालय संस्कृती ही टिकली पाहिजे,ती वाढली पाहिजे याकरता या भालोद गावातील ही बहिणाबाई अभ्यासिका जिवंत ठेवणे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.

प्रारंभी महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर, कवयत्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. सुनील नेवे यांनी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय भालोदच्या वतीने काही पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. या अभ्यासिकेमध्ये जास्तीत जास्त वेळ अभ्यास करणारे विद्यार्थी आकाश दीपक भालेराव, सचिन मुकुंदा पाटील, अनिकेत किशोर भालेराव या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे हे होते.  कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. मुकेश चौधरी, विद्यार्थी विकास विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आशुतोष वर्डीकर,अभ्यासिकेचे समिती सदस्य डॉ. जतीन मेढे, डॉ. दिगंबर खोब्रागडे, प्रा. डॉ.मोहिनी तायडे, प्रा. राजेंद्र इंगळे, तुळशीराम पाटील, डॉ. किरण चौधरी, डॉ. दिनेश पाटील, डॉ. वसंतराव पवार, डॉ. पद्माकर सावळे, प्रा. काशिनाथ पाटील, प्रा.चंद्रकांत वानखेडे, प्रा. हेमंत इंगळे, डॉ. गणेश चौधरी, डॉ.राकेश चौधरी, डॉ. मीनाक्षी वाघुळदे, प्रा. गीतांजली चौधरी, प्रा. फाल्गुनी राणे, प्रा.हेमलता कोल्हे, प्रा. शैलजा इंगळे, प्रा. कोमल सावळे ,प्रा. भावना प्रजापती, मोहिनी चौधरी आदी उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी दिलीप इंगळे, कल्याण चौधरी, किशोर चौधरी, तुळशीराम पाटील, बाळकृष्ण चौधरी, पंकज नेहते, मुबारक तडवी, रूपम बेंडाळे, चंद्रकांत लोखंडे या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन विद्यार्थी अतिकेश माळी तर आभार  प्रा. डॉ. मोहिनी तायडे यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment