Bharti Singh On Mahakumbh : प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे आयोजित महाकुंभ 2025 मध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी पवित्र स्नान केले आहे. तथापि, विनोदी कलाकार भारती सिंग यांनी महाकुंभात स्नान करण्याची योजना रद्द केली आहे. त्यांनी याचे कारण म्हणून अलीकडेच महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या सुरक्षेच्या चिंतेचा उल्लेख केला आहे.
29 जानेवारी 2025 रोजी महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला आणि 60 हून अधिक जण जखमी झाले.
हेही वाचा : Jalgaon Crime News: सहकाऱ्यांनाच ठगले! महिला पोलिस कर्मचाऱ्याकडून ३० लाखांची फसवणूक
या घटनेनंतर भारती सिंग यांनी महाकुंभात जाण्याची योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान एका व्यक्तीने तिला प्रश्न विचारला, भारती जी, तुम्ही महाकुंभला जात नाही का? यावर भारती म्हणाली, ‘बेशुद्ध होऊन मरण्यासाठी की हरवण्यासाठी… मला महाकुंभला जायचं होतं. पण रोज हैराण करणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. अशात गोलासोबत जाणं शक्य नाही…’ असं भारती म्हणाली.
भारती सिंग यांच्या या निर्णयावर इंटरनेटवर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही लोकांनी त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे, तर काहींनी त्यांना ट्रोल केले आहे. एकाने लिहिले, “ती बरोबर आहे. इथे खूप गर्दी आहे आणि ते मुलांसाठी धोकादायक ठरू शकते.” तर दुसऱ्याने म्हटले, “कुंभाची बदनामी करू नका.” असेही म्हटलं आहे.
प्रयागराज येथील महाकुंभ 2025 ला देशभरातून आणि जगातून लोक संगमात श्रद्धेने स्नान करण्यासाठी येत आहेत. बॉलीवूडपासून ते टीव्ही स्टार्सपर्यंत अनेकजण संगमात स्नान करताना दिसले आहेत.