---Advertisement---

Jalgaon Accident News: भुसावळहून पुण्याकडे निघालेली ट्रॅव्हल्स गारखेड्याजवळ उलटली, अनेक प्रवासी गंभीर

by team

---Advertisement---

Jalgaon Accident News: जामनेर तालुक्यातील गारखेडाजवळ भीषण अपघात झाला आहे. भुसावळहून पुण्याकडे निघालेली संगीतम ट्रॅव्हल्सची खासगी प्रवासी बसचा हा अपघात झाला आहे. ही ट्रॅव्हल्स १ जून रोजी भुसावळहून पुणे जात असताना रात्री ९ ते ९:३० च्या दरम्यान गारखेडा गावाजवळ उलटली. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे. जखमींवर जामनेर, जळगाव, भुसावळ येथे उपचार सुरु आहे.

याबाबत माहिती अशी की, गारखेडा परिसरात सध्या रस्त्याचे दुभाजकाचे करण्याचा काम सुरू आहे. दरम्यान, १ जून रोजी रात्री संगीतम ट्रॅव्हल्सची खासगी प्रवासी बस पुण्याकडे निघाली असता भरधाव वेगातील बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा अंदाज आहे.

ही खासगी बस उलटल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान, रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाली होती. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. यातील काही जखमी प्रवाशांना जळगाव तर काहीना जामनेर, भुसावळ हलविण्यात आले आहे. बसमध्ये नेमके किती प्रवासी होते व कितीजण जखमी झाले, याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. घटनास्थळी पोलीस व आपत्कालीन सेवा दाखल झाले असून, बचावकार्य सुरू आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment